TRENDING:

बाप्पाला निरोप देण्यासाठी जा बिनधास्त! मुंबईत पश्चिम आणि मध्य मार्गावर मध्यरात्री धावणार विशेष लोकल

Last Updated:

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम आणि मध्य मार्गावर मध्यरात्री विशेष लोकल धावणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 26 सप्टेंबर : मुंबईतील बहुसंख्य घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी होते. त्यामुळे भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी 28 सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आठ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. तर मध्य रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी 28 सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत दहा विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
News18
News18
advertisement

मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबईबाहेरून असंख्य भाविक येतात. त्यांना मुंबईत येण्यासाठी आणि पुन्हा मुंबईतून परतीचा प्रवास करण्यासाठी पश्चिम, मध्य रेल्वेने गुरुवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘इथं’ पाहिला मिळतीय थेट रामसेतूची तरंगणारी शीला; बाप्पासाठी तयार केला राम सेतूचा देखावा Video

advertisement

मेन लाइन - डाऊन स्पेशल : सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून 01.40 वाजता सुटून कल्याणला 3.10 वाजता पोहोचेल. सीएसएमटी-ठाणे स्पेशल सीएसएमटीहून 02.30 वाजता सुटेल आणि 03.30 वाजता ठाण्याला पोहोचेल. सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून 03.25 वाजता सुटेल आणि 4.55 वाजता कल्याणला पोहोचेल.

मुख्य लाइन अप विशेष : कल्याण-सीएसएमटी स्पेशल कल्याणहून 00.05 वाजता सुटेल आणि 01.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 01.00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 02.00 वाजता पोहोचेल.ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 02.00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 03.00 वाजता पोहोचेल.

advertisement

चांदीची प्रभावळ अन् सोन्याचे अलंकार, कसा आहे कोल्हापुरातील सुवर्ण गणपती!

हार्बर लाईन - डाऊन स्पेशल :सीएसएमटी-बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 01.30 वाजता सुटेल आणि बेलापूरला 02.35 वाजता पोहोचेल.सीएसएमटी- बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 02.45 वाजता सुटेल आणि बेलापूरला 03.50 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन अप विशेष : बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 01.15 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 02.20 वाजता पोहोचेल.बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 02.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 03.05 वाजता पोहोचेल.

advertisement

5 दिवस उशिरा होते या गणपतीची स्थापना; काय आहे परंपरा Video

चर्चगेटहून विरारसाठी रात्री 1.25, 1.55, 2.25 आणि 3.20 वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री 12.15, 12.45, 1.40 आणि पहाटे 3 वाजता लोकल सुटेल. पश्चिम रेल्वेवर गर्दीच्यावेळी अप जलद मार्गावरील लोकल सेवा मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान थांबत नाही. मात्र गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपासून ते रात्री 8.30 वाजेपर्यंत अप दिशेकडे जाणाऱ्या सर्व जलद लोकल, मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान चर्नी रोड सहित सर्व स्थानकात थांबेल. चर्नी रोड स्थानकात फलाट क्रमांक 2 वर प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने या स्थानकात लोकल थांबणार नाहीत. गुरुवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत अप धीम्या लोकल चर्नी रोडवर थांबणार नाहीत. त्यामुळे चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर कोणतीही लोकल सेवा उपलब्ध नसेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
बाप्पाला निरोप देण्यासाठी जा बिनधास्त! मुंबईत पश्चिम आणि मध्य मार्गावर मध्यरात्री धावणार विशेष लोकल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल