‘इथं’ पाहिला मिळतीय थेट रामसेतूची तरंगणारी शीला; बाप्पासाठी तयार केला राम सेतूचा देखावा Video

Last Updated:

जालन्यातील एका मंडळाने राम सेतूचा देखावा सादर केला आहे.

+
News18

News18

जालना, 26 सप्टेंबर : गणेश उत्सवाची धूम संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. प्रत्येक गणेश मंडळ नवनवीन देखावे सादर करून शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जालन्यातील एका मंडळाने असाच राम सेतूचा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.
जालना शहरातील मिशन हॉस्पिटल पाशी असलेल्या सिंधी युवक मित्र मंडळाने राम सेतूचा देखावा सादर केला आहे. केवळ देखावा सादर केला नाही तर प्रत्यक्ष रामसेतू येथून एक शीला देखील या मंडळांने आणली आहे. 24 तास सीसीटीव्हीच्या नगराणीत असलेली ही शिळा थेट रामेश्वरम इथून आणण्यात आली आहे.
advertisement
कसा आहे देखावा?
आम्ही पहिल्यांदाच यावर्षी एक गणपतीचा देखावा केला आहे. आमचा पूर्ण प्रयत्न होता की, लहान मुलांपासून सर्वांना याबद्दल माहिती मिळाली पाहिजे की श्री रामजीनी किती मोठ कर्तुत्व केलं होत. एक किती मोठा सेतू बांधला होता. हे फक्त राम नावांनी त्यांनी केलं. एक दगडवर राम नाव लिहिल्यावर तो दगड पाण्यावर तरंगला होता आणि ती एवढी मोठे कर्तृत्व सगळ्यांना माहिती असायला पाहिजे तेच डोक्यात ठेवून आम्ही इथे आमचे देखावा तयार केला आहे.
advertisement
लहान लहान मुले देखावा पाहण्यासाठी येतील. घरी गेल्यानंतर ते आपल्या आई-बाबांना नक्की विचारतील की, हे काय होते? यातून लहान मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हेच डोक्यात ठेवून आम्ही ही शिळा रामेश्वरम इथून आणली असून हा सुंदर देखावा सादर केला, असं मंडळ असं कपिल चावला यांनी सांगितले.
चांदीची प्रभावळ अन् सोन्याचे अलंकार, कसा आहे कोल्हापुरातील सुवर्ण गणपती!
आम्ही सगळ्यात आधी सुरुवात केलीये रामेश्वरममधून रामेश्वरम जिथून हा रामसेतू सुरू झाला होता. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण राम सेतू दाखवलाय आणि श्री रामाच्या कृपेने  आम्हाला रामशेतूची एक ओरिजनल एक अस्सल शीला सुद्धा भेटली जिथे आम्ही दर्शनासाठी ठेवली. आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत की आम्हाला ही एक संधी मिळाली की आम्ही जालना शहरातील लोकांना या शिलेचे दर्शन देऊ शकत आहोत. त्याच्यानंतर ते सगळे पार करून लोकं लंकाला पोहोचतात लंकाला पोचल्यावर एक छोटीशी गुफा पार करून ते अशोक वाटिकाला पोहोचतात अशोक वाटिकाला येऊन सीताचे दर्शन घेऊन सगळे लोक बाहेर पडू शकतात, असं चावला यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
‘इथं’ पाहिला मिळतीय थेट रामसेतूची तरंगणारी शीला; बाप्पासाठी तयार केला राम सेतूचा देखावा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement