मुंबई : हस्तकलेतून निर्माण होणारे साहित्य सगळ्यांनाच आवडतात. तुम्हालाही जर अशा हॅन्डक्राफ्ट वस्तू आवडत असतील सर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. खार रोड येथील भामिनी स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हॅन्डक्राफ्ट वस्तूंची खरेदी करू शकता.
कुणाला स्पेशल गिफ्ट द्यायचं असेल किंवा आठवणीत राहणारी वस्तू भेट म्हणून द्यायची असेल तर भामिनी स्टोअर एक उत्तम पर्याय आहे. खार रोड स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणारे हे भामिनी स्टोअर वेगवेगळ्या राज्यांतून आणल्या जाणाऱ्या हॅन्डक्राफ्ट वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
या दुकानात तुम्हाला आंध्र प्रदेश, वाराणसी, दिल्ली, छत्तीसगड, जयपुर, जम्मू आणि काश्मीर अशा विविध राज्यांतून आणलेल्या हॅण्डक्राफ्ट वस्तू मिळतील. या दुकानात तुम्हाला सुंदर युनिक दागिनेही मिळतील, जे तुमच्या एस्थेटिक लूकला परिपूर्ण बनवतील. या दागिन्यांची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते. इथे मिळणाऱ्या बॅग्ससुध्दा युनिक आणि सुंदर आहेत. यांची किंमत साधारण 150 ते 200 रुपयांपासून सुरु होते.
तसेच चंदनापासून बनवलेली ज्वेलरीसुद्धा तुम्हाला इथे फक्त 150 रुपयांपासून मिळेल. यांची आणखी स्पेशालिटी म्हणजे इथे मिळणारे कॉफी ट्रे, देवांच्या मूर्ती या वाराणसीमधून आणण्यात आल्या आहेत. तर दागिने ठेवण्याचे बॉक्स काश्मीरमधून आणलेले आहेत.
तसेच दुधीचे लॅम्पसुद्धा इथे मिळतात, जे छत्तीसगडमधून स्पेशल मागवण्यात आले आहेत. हे दुधीपासून बनवलेले लॅम्प आहेत, असे यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. अगरबत्ती, धूप या गोष्टी सुद्धा इथे मिळतात, ज्या पाँडिचेरीवरुन मागवण्यात आलेल्या आहेत.
पहिला श्रावण सोमवार, खडकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, छ. संभाजीनगरमधील Photos
'आमच्या दुकानात विविध राज्यातून आणलेल्या तिथल्या स्पेशल वस्तू मिळतात. आमच्या इथे मिळणारी ज्वेलरी मुलींना प्रचंड आवडते. आमच्या दुकानात मिळणाऱ्या घर सजावटीच्या वस्तू तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाहीत. अगदी जम्मू काश्मीर, छत्तीसगड इथून आम्ही वस्तू आणतो,' असे भामिनी स्टोअरच्या दुकानदार अक्षता जयकार यांनी सांगितले.
या भामिनी स्टोअरमध्ये तुम्हाला डायरी, लॅम्प, मूर्ती, स्कार्फ, बॅग्स, ज्वेलरी, बुकमार्क, शोभेच्या वस्तू या सगळ्या गोष्टी युनिक आणि सुंदर मिळतील. जर तुम्हालाही कुणाला आठवणीत राहील, असे स्पेशल गिफ्ट द्यायचे असेल तर नक्की खार रोड मधील या भामिनी स्टोअरला भेट द्या.