नीट पीजी 2026परीक्षेचे बिगुल वाजले
जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार 'NEET MDS 2026' परीक्षा 2 मे 2026 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी आपली इंटर्नशिप 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण करणारे विद्यार्थीच परीक्षेसाठी पात्र असतील. त्याचप्रमाणे 'NEET PG 2026' परीक्षा 30 ऑगस्ट 2026 रोजी होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाची आंतरवासिता पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
NBEMS कडून जाहीर करण्यात आलेल्या या तारखा संभाव्य असून अंतिम वेळापत्रक माहिती पुस्तिकेद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळ https://natboard.edu.in वर उपलब्ध होईल. यामध्ये पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत, वेळापत्रक तसेच इतर महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश असेल.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ NBEMS च्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे. परीक्षा संदर्भातील शंका किंवा सहाय्यासाठी उमेदवारांनी 'https://exam.natboard.edu.in/communication.php?page=main' या कम्युनिकेशन पोर्टलला नियमित भेट द्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
