मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
काही राजकीय पक्ष जरांगेंच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यातच जरांगेंच्या उपोषणाला अनेक आमदार-खासदारांनी पाठिंबा दिला आहे. आज (शुक्रवारी) आझाद मैदानात मनोज जरांगेंना राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार भेटले आहेत. विशेष म्हणजे, सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही जरांगेंच्या मंचावर पाहायला मिळाले. तर रात्री भाजप आमदार सुरेश धसही जरागेंना भेटले आहेत.
advertisement
कोण कोण जरांगेंना भेटलंय?
भास्कर भगरे, खासदार, राष्ट्रवादी(एस.पी)
बजरंग सोनवणे, खासदार, राष्ट्रवादी(एस.पी)
ओमराजे निंबाळकर, खासदार, शिवसेना(उबाठा)
संजय जाधव, खासदार, शिवसेना(उबाठा)
प्रकाश सोळंखे,आमदार, राष्ट्रवादी
संदीप क्षीरसागर,आमदार, राष्ट्रवादी(एस.पी)
विजय सिंह पंडीत,आमदार, राष्ट्रवादी
सुरेश धस, आमदार, भाजप
प्रवीण स्वामी,आमदार, शिवसेना(उबाठा)
अभिजीत पाटील, आमदार,राष्ट्रवादी(एस.पी)
कैलास पाटील आमदार, शिवसेना(उबाठा)
अंबादास दानवे, नेते, शिवसेना(उबाठा)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
दरम्यान,, 'मराठा समाजासाठी जे जे आवश्यक होते ते सर्व सरकारने केले असून यापुढेही करत राहू. इतर समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला देता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत मराठा समाजासाठी जे योग्य आहे ते देण्याची सरकारची आजही तयारी आहे, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.