नाताळ व नववर्षाच्या काळात गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते, त्यामुळे ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाडी क्रमांक 22115 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून दर गुरुवारी पहाटे 00.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.15 वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 22116 दर गुरुवारी दुपारी 13.50 वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
advertisement
Tatkal Ticket: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम, मोबाईल...
थांबे कुठे?
या गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत, त्यामुळे कोकणातील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ होणार आहे. या विशेष गाडीच्या संरचनेमध्ये एक प्रथम वातानुकूलित डबा, तीन द्वितीय वातानुकूलित, पंधरा तृतीय वातानुकूलित डबे, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर कार यांचा समावेश आहे.
आरक्षण सुविधा
या गाड्यांसाठीची आरक्षणे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर खुली करण्यात आली आहेत. प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रक व अद्ययावत माहितीकरिता NTES ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.






