TRENDING:

Ganeshotsav 2025: 1300 वर्षांपूर्वी कशी होती बाप्पांची मूर्ती? गणपतीच्या रुपात कसे झाले बदल? ऐतिहासिक ठेव्याचा Video

Last Updated:

7 व्या शतकापासून 17 व्या शतकापर्यंत विविध भागांमध्ये घडवलेल्या गणेश मूर्ती आजही पाहायला मिळतात. या मूर्तींचा खजिना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने जतन केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात आपण बाप्पाला घराघरांत आणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की गणपती बाप्पाच्या मूर्ती शतकानुशतकांपासून किती अप्रतिम रीत्या घडवल्या गेल्या आहेत? अगदी 7 व्या शतकापासून 17 व्या शतकापर्यंत विविध भागांमध्ये घडवलेल्या गणेश मूर्ती आजही पाहायला मिळतात. या मूर्तींचा खजिना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने जतन केला आहे.
advertisement

या संग्रहालयात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि नेपाळ या विविध ठिकाणांहून आलेल्या गणेश मूर्ती आहेत. दगड, धातू, कांस्य किंवा अगदी शिलालेखात कोरलेल्या या मूर्तींमधून त्या काळातील कला, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा डोळ्यांसमोर उभी राहते. याबद्दलच पुरातत्त्वशास्त्र विभागाच्या अधीक्षक अपर्णा भोगल यांनी माहिती सांगितली आहे.

Dagdusheth Ganpati: ढोल-ताशांचा गजर अन् मंत्रोच्चाराचे सूर, दगडूशेठ गणपती थाटात विराजमान, Video

advertisement

हरसोल, गुजरात (इ.स. 7 वे शतक)

जरी भग्न असली तरी ही मूर्ती वक्रतुंड महाकाय या स्तोत्रातील रूप आठवते. मोठं पोट असलेला लंबोदर गणेश या शिल्पात स्पष्ट दिसतो.

प्राचीन शिल्पांची झलक

ठाणे महाराष्ट्र (इ.स. 11 वे शतक) पूर्ण भारतभर आणि विशेषतः महाराष्ट्रात गजमुख असलेल्या गणेशाची पूजा लोकप्रिय आहे. गणेश हा विघ्नहर्ता असून ती बुद्धीची देवता आहे म्हणूनच प्रत्येक कार्याची सुरुवात गणेशवंदनेनेच होते. या मूर्तीत गणेशाच्या हातात त्याचा तुटलेला दात, लाडूपात्र आणि कमळाची कळी आहे. त्याचा वरचा एक हात खंडित आहे, त्यामध्ये कदाचित त्याने अंकुश धरलेला असावा. त्याच्या कमरेला सर्पबंध आहे. मूषकाचे म्हणजेच त्याच्या वाहनाचे अंकन त्याच्या पायाजवळ आहे. जैन तसेच तिबेटी बौद्ध धर्मातही गणेशाची आराधना केली जाते. त्याचप्रमाणे भारताबाहेर दक्षिण व पूर्व आशिया तसेच दक्षिण-पूर्व आशियातही गणेशाची आराधना केली जाते.

advertisement

कर्नाटक, होयसळ काळ (इ.स. 12 वे शतक)

काळ्या दगडातील ही मूर्ती दक्षिण भारतातील होयसळ शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या काळात गणेश पंचायतन पूजेत पाच प्रमुख देवतांपैकी एक मानला गेला.

धातू आणि नेपाळी कला

कांस्य गणपती (तामिळनाडू, 16वे-17वे शतक)

या काळातील कांस्य शिल्पे दक्षिण भारतातील धातुकलेचा उत्कर्ष दाखवतात.

हेरंब गणपती (नेपाळ, 19 वे शतक)

advertisement

गणेशाच्या 32 रूपांपैकी हेरंब गणपती हे 11 वे रूप आहे. तो दुर्बलांचा संरक्षक देव आहे. या अवतारामध्ये गणेश पाच डोके दहा भुजाधारी आहेत. त्यांचा मुख्य उजवा हात अभय मुद्रेमध्ये आणि डावा हात वरद मुद्रेमध्ये आहे.

तेलाचा दिवा (नेपाळ, 20 वे शतक )

नेपाळमध्ये धार्मिक कार्यात दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेथे विविध प्रकारचे आणि आकाराचे तेलाचे दिवे बनवले जात होते. यात मुख्यतः मंदिराच्या आकाराचे तसेच देवांच्या मूर्ती असणाऱ्या दिव्यांचा समावेश आहे.

advertisement

ऐतिहासिक वारशाचा ठेवा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

या मूर्तींमधून दिसतं की गणेशपूजन केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. जैन, तिबेटी बौद्ध परंपरा तसेच दक्षिण-पूर्व आशियातही गणेशाची पूजा केली जाते.

मराठी बातम्या/मुंबई/
Ganeshotsav 2025: 1300 वर्षांपूर्वी कशी होती बाप्पांची मूर्ती? गणपतीच्या रुपात कसे झाले बदल? ऐतिहासिक ठेव्याचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल