मुंबई: मुंबई जशी मायानगरी तशीच कलानगरी देखील आहे. मुंबईत अनेक मोठ-मोठे कला महोत्सव देखील होत असतात. यातीलच एक सर्वात जुना आणि प्रसिद्ध महोत्सव म्हणजे काला घोडा आर्ट फेस्टिव्हल होय. यंदा काला घोडा महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. त्यामुळे 50 पेक्षा अधिक कलाकृती, शिल्पकृती आणि 100 पेक्षा अधिक स्टॉल पाहायला मिळणार आहेत. यामध्ये एक भला मोठा केक सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरतोय. याबाबत आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
advertisement
काला आर्ट फेस्टिवलच्या निमित्ताने वेगवेगळ्या कलाकारांना एकाच ठिकाणी एक मंच उपलब्ध करून दिला जातो. फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून आलेल्या कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती, चित्र, वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे शिल्पकृती इथे पाहायला मिळतात. यंदाच्या वर्षी काला घोडा आर्ट फेस्टिवल चे 25 वे वर्षे आहे आणि हेच 25 वा वर्ष साजरा करताना एक भला मोठा केक आपल्याला दिसतो. टॅक्सीवर साकारलेल्या ब्लॅक फॉरेस्ट या केककडे सर्वांचाच लक्ष लागून राहिले आहे.
व्हेज खायचं तर थेट इथं यायचं! कांदिवलीतील प्रसिद्ध शॉरमा, शेफ स्पेशल खायला लागते रांग
काला घोडा आर्ट फेस्टिवलच्या सुरुवातीलाच एक मोठा गेट असतो. या गेटच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या विंटेज टॅक्सी आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात. मात्र यंदा इथे एक टॅक्सी आहे आणि त्यावर भला मोठा केक आहे. हेतल शुक्ला या कलाकारा बनवलेली ही केक टॅक्सी सर्वांनाच खूप भावते आहे. या टॅक्सी मागचा संदेश त्यांनी लोकल 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
केक टॅक्सीचा संदेश काय?
“जेव्हा कोणत्याही नेत्याचा किंवा मोठ्या लोकांचा वाढदिवस असतो तेव्हा ते जबरदस्तीने आपल्या घरासमोर बॅनरचे प्रदर्शन करत असतात. कोणत्याही परवानगीशिवाय आणि कोणालाही न विचारता ही बॅनरबाजी नेहमीच सर्रास आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठे केक देखील कापले जातात. याच बॅनरबाजीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्यासाठी हा केक आणि ही केकच्या मागे बॅनरबाजी दाखवण्यात आली आहे. लोकांनी या टॅक्सीमाचा संदेश जाणून घेतला पाहिजे. त्यासाठी मी ही केक टॅक्स अशी बनवली आहे, असं शुक्ला सांगतात.