सायनमधील आणिक आगारात बेस्टचे वस्तू संग्रहालय आहे. या वस्तूसंग्रहालयात 1874 ते 1960 पर्यंतचा इतिहास प्रभावीपणे मांडण्यात आलाय. मुंबईतील स्थानिक प्रवासी वाहतूक व विद्युत पुरवठा या दोन महत्त्वाच्या सेवांबाबत अनेक पुरातन वस्तू, माहिती, दस्तऐवज, चल प्रतिकृती, स्थिर प्रतिकृती, छायाचित्रे यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात.
सण-उत्सवासाठी ‘इथं’ करा 150 पेक्षा जास्त ब्लाऊज पॅटर्नची स्वस्त खरेदी
advertisement
घोड्यांनी ओढली जाणारी ट्राम, अमेरिकन ट्रेलर ट्राम, स्कोडा कंपनीची विद्युत ट्रॉली बस, ट्रामची व बसची जुनी तिकिटे, तिकिटे देणारी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे या सर्व गोष्टी या संग्रहालयात आकर्षकपणे मांडण्यात आल्या आहेत.
मैद्याचा नाही तर भाकरीचा पिझ्झा, मुंबईतल्या खाऊ गल्लीत होतेय तुफान गर्दी
बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील विविध प्रकारची विद्युत मीटर, विद्युत स्वीच गेअर, सर्किट ब्रेकर, गॅसवर चालणारा जुना पथदिवा, दिवे दुरुस्त करण्याचा हॅण्ड टॉवर, विद्युत देयकांची यंत्रे, कार्यालयीन कामाकाजासाठी वापरली जाणारी जुनी कॅलक्युलेटर्स यासारख्या अनेक दुर्मिळ वस्तूदेखील या संग्रहालयात आहेत.
कुठे पाहणार?
स्थळ : बेस्ट संग्रहालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला,
आणिक बस आगार, सायन पूर्व
मुंबई - 400022





