मैद्याचा नाही तर भाकरीचा पिझ्झा, मुंबईतल्या खाऊ गल्लीत होतेय तुफान गर्दी

Last Updated:

सध्या पिझ्झा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ झालाय. पण अगदी भारतीय स्टाईलचा भाकरीचा पिझ्झा कधी ट्राय केलाय का? मग पाहा रेसिपी

+
मैद्याचा

मैद्याचा नाही तर भाकरीचा पिझ्झा, मुंबईतल्या खाऊ गल्लीत होतेय तुफान गर्दी

मुंबई, 11 सप्टेंबर : जगभरात विविध प्रकारच्या पिझ्झांनी अगदी बालकांपासून वयोवृद्धयांची जीभ चांगलीच चाळवली आहे. मूळचा इटलीचा हा पदार्थ नवनव्या स्वरूपात खवैय्यांना भुलवतोय आणि न्याहरी, दुपारचे भोजन किंवा रात्रीचे जेवण अशा कोणत्याही वेळी पोटात जागा मिळवितोय. सध्या मुंबईमधील घाटकोपरच्या खाऊ गल्ली मध्ये भाकरी पिझ्झा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. भारतीय पद्धतीने तयार केलेल्या या पिझ्झाला विविध वयोगटाची मागणी देखील पाहायला मिळतेय. अल्पा कुबावत यांनी याबाबत माहिती दिलीय.
कोरोना काळात सुरू केला व्यवसाय
अल्पा कुबावत सांगतात की, घाटकोपर पूर्व येथे खाऊ गल्ली मध्ये रामानंदी म्हणून माझा स्टॉल आहे. कोरोना मध्ये घराची परिस्थिती बिघडली होती आणि आर्थिक समस्या जाणवत होती. यानंतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा असं नेहमी वाटत होतं. तसचं कोरोना मध्ये ब्रेड सुद्धा उपलब्ध होत नव्हते आणि विकत जरी घ्यायचं म्हटलं तरी मनात भीती होती. अशा वेळेसच घरात बाजरीच्या भाकरीवर, गव्हाच्या भाकरीवर पिझ्झा तयार केला. तो माझ्या घरात सर्वांना आवडत देखील होता. इथूनच स्वतःचं काहीतरी सुरू करावा म्हणून भाकरी पिझ्झाची सुरुवात केली.
advertisement
भाकरी पिझ्झा पौष्टिक
बाजारात मिळणारा पिझ्झा मैद्याचा असल्यामुळे तो शरीराच्या दृष्टीने हानिकारक असतो. मात्र भाकरी पिझ्झा पौष्टिक असून त्यामुळे आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. आता भाकरी पिझ्झा मध्ये दोन प्रकार असून येत्या काळात आणखी प्रकार सुरू करण्याचा विचार आहे. लहान मुलं, तरुणाई त्याचबरोबर सर्वात जास्त वयोवृद्ध माणसांना देखील हा पिझ्झा खावासा वाटतो. त्याची मागणी देखील सगळ्यात जास्त असल्याचं अल्पा कुबावत सांगतात.
advertisement
कसा तयार होतो ?
सर्वात प्रथम बाजरीच्या पिठाचा भाकरीला बनवतो तसा गोळा बनवून घ्यायचा. आपण भाकरीला पोपडा आणतो मात्र पिझ्झा बेसला पोपडा आणायचा नाही. आता भाकरी छान जाडसर थापून किंवा लाटून घ्या. तवा गरम झाला कि त्यावर भाकरी टाकून पाणी लाऊन छान भाजुन घ्या. आता भाकरी छान भाजली की त्यावर घरातल साजूक तूप लावून घ्या. आपली मस्त भाकरी पिझ्झा बेस तयार आहे.
advertisement
आता टॉपिंगची तयारी करून घ्या. सर्व साहित्य चिरून घ्या आणि टॉपिंग करून घ्या. आवडीनुसार भाज्यांचे लेअर करून घ्या. सॉस लावा. आता पिझ्झा परफेक्ट तयार आहे. त्यावर पिझ्झा सिजनिंग घाला. लाल तिखट भुरभुरून घ्या. आपला पिझ्झा बेक होण्यासाठी तयार आहे. त्यावर भरपूर चीज किसून घ्या आणि तवा गरम झाला की त्यावर बेक करून घ्या. मस्त 2 ते 3 मिनिटांनी आपला गरमागरम फ्युजन चिजी भाकरीचा किंवा चिजी भाकरी पिझ्झा तयार आहे.
मराठी बातम्या/Food/
मैद्याचा नाही तर भाकरीचा पिझ्झा, मुंबईतल्या खाऊ गल्लीत होतेय तुफान गर्दी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement