या गाड्यांना मेगाब्लॉकचा फटका
मंगळवारी सकाळी 7.40 ते 10.40 रत्नागिरी कडवई दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 9 ऑक्टोबर रोजी तिरुनवेल जामनगर गाडी कर्नाटकातील ठोकूर या ठिकाणी तीन तास थांबवण्यात येणार आहे. तसेच तिरुअनंतपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक नेत्रावती एक्सप्रेस ठोकूर - रत्नागिरी दरम्यान दीड तास थांबवण्यात येईल. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस खेळ चिपळूण दरम्यान थांबवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
advertisement
दिव्यांग खेळाडूंची विशेष कामगिरी, पाहा कशी झाली जलतरण स्पर्धा? Video
गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी मडगाव कुमटा दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळूर सेंट्रल - मडगाव रेल्वे मंगळूर - कुमटा दरम्यान धावेल. तर कुमटा - मडगाव दरम्यान ही गाडी रद्द करण्यात येणार आहे. मडगाव - मंगळूर विशेष गाडी कुमटा - मंगळूर म्हणून धावेल, अशी माहितीही कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.