मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मुंबईतील गिरगावमधील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये आज सकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी सूर्योदयापासून ते सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटे सूर्यास्तापर्यंत सलग 1 हजार 12 मराठी गीते सादर करण्यात येत आहेत. यामध्ये विविध काळातील मराठी चित्रपट व नाट्यगीते, अभंग, भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, आरती, बडबडगीते, बालगीत आदी मराठी गीते सादर करण्यात येत आहेत. शाळेतील शिशू वर्गापासून ते 10 वी पर्यंतची सगळ्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे. या कार्यक्रमाची कल्पना 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ला देण्यात आली आहे.
advertisement
या कार्यक्रमात एकूण साडेनऊ विद्यार्थी आणि इतर शिक्षकही सहभागी झाले आहेत. आजी-माजी विद्यार्थी त्यासोबतच शिक्षकांनीही या कार्यक्रमासाठी गेला आठवडाभर प्रचंड मेहनत केली आहे. सकाळी सुरू झालेला हा कार्यक्रम आज संध्याकाळपर्यंत सुरू असणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमात एकूण 1 हजार 12 गीते सादर होणार आहे. यासोबतच शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर पुस्तकांचे गाव सुद्धा साकारण्यात आले आहे. या भिलार गावात वेगवेगळ्या कादंबऱ्यांपासून लहानग्यांच्या पुस्तकांपर्यंत सगळ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Career in Marathi: मराठी भाषेत देखील होऊ शकतं करियर, तुम्हाला माहितीये का या संधी?
'मराठी भाषा गौरव दिन म्हणजे नक्की काय हे विद्यार्थ्यांना कळायला हवं याच उद्देशाने आम्ही हा मराठी गीतांचा कार्यक्रम करत आहोत. शाळेचे सचिव डॉ. गुरुनाथ पंडित सर यांना खरंतर या कार्यक्रमाची कल्पना सुचली होती. मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाला आणि त्यानंतरचा पहिलाच मराठी भाषा गौरव दिन आहे त्यामुळे तो कायम मुलांच्या आणि आमच्याही लक्षात राहावा यासाठी हा कार्यक्रम करण्याचा आम्ही विचार केला. आज आमची संपूर्ण शाळाच, आमचं संपूर्ण घरच गाणं गातय असंच वाटतंय' असे शाळेच्या मुख्याध्यापिका संचिता गावडे यांनी सांगितले.
शाळेने सकाळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाषांमध्ये असणारे वैविध्य दाखवत, मराठीतील बोलीभाषा कोणत्या ही लोकांना कळावं यासाठी रॅली सुद्धा काढण्यात आली होती. शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून गाणं सादर करून घेण आणि सलग दिवसभर कार्यक्रम सुरू ठेवणं ही सोपी गोष्ट नव्हे. मराठी शाळांमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त असे कार्यक्रम होण ही सध्या काळाची गरज आहे. शिरोळकर हायस्कूल वर सध्या त्यांच्या या नव्या उपक्रमाने कौतुकाचा वर्षाव होत आहे.