TRENDING:

MHADA Lottery 2025 : घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या 5285 घरांसाठी लॉटरी, आजपासून करा अर्ज

Last Updated:

MHADA Lottery 2025: तुमच्या स्वप्नातील घर आता प्रत्यक्षात उतरवण्याची हीच वेळ आहे. म्हाडाकडून लॉटरी काढण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुमच्या स्वप्नातील घर आता प्रत्यक्षात उतरवण्याची हीच वेळ आहे. म्हाडाकडून लॉटरी काढण्यात आली आहे. म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण) कोकण मंडळाने घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे.
MHADA Lottery 2025 : म्हाडा लॉटरी अर्ज कसा करावा कोणत्या ठिकाणी किती घरं,  पाहा
MHADA Lottery 2025 : म्हाडा लॉटरी अर्ज कसा करावा कोणत्या ठिकाणी किती घरं,  पाहा
advertisement

वसई, ठाणे, कुळगाव-बदलापूर आणि सिंधुदुर्ग येथे एकूण 5,285 घरे आणि 77 भूखंड लॉटरीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. ही लॉटरी संगणकीकृत पद्धतीने 3 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून, अर्ज प्रक्रिया सोमवारी 14 जुलै 2025 दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. ही घरे विविध योजना आणि श्रेणींमध्ये देण्यात येणार असून, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असेल. ही प्रक्रिया ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू होणार आहे.

advertisement

Poetry Writing: शिक्षण फक्त दुसरीपर्यंत, लिहिल्या 600 कविता, सोलापुरातील विमल यांची थक्क करणारी कहाणी

कोणकोणत्या योजनेंतर्गत घरे आणि भूखंड मिळणार आहेत?

1) 20% समावेशित गृहनिर्माण योजना: 565 घरे

2) 15% एकत्रित नागरी गृहनिर्माण योजना: 3,002 घरे

3) कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व उपलब्ध जुन्या स्थितीतील घरे: 1,677

advertisement

4) कोकण मंडळ परवडणारी घरे : 51 घरे (यातील 50% घरे स्वस्त दरात)

5) कोकण मंडळ भूखंड योजना: 77 भूखंड

महत्त्वाच्या तारखा:

1) अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025, रात्री 11:59

2) अर्ज शुल्क (EMD) भरण्याची अंतिम तारीख: 14 ऑगस्ट 2025, रात्री 11:59

advertisement

3) तात्पुरती अर्जदार यादी जाहीर: 21 ऑगस्ट 2025, संध्या. 6 वाजता

4) हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025, संध्या. 6 वाजता

5) अंतिम पात्र अर्जदार यादी: 1 सप्टेंबर 2025, संध्या. 6 वाजता

6) लॉटरीचा निकाल (संगणकीकृत सोडत): 3 सप्टेंबर 2025, सकाळी 10 वाजता

advertisement

 एकंदरीत, 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, पात्र अर्जांची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जाहीर करण्यात येणार आहे. सोडतीचा निकाल अर्जदारांना तत्काळ मोबाइलवर SMS, ईमेल तसेच मोबाइल ॲपद्वारे प्राप्त होईल.

अर्ज कसा करावा?

अर्ज करणाऱ्यांनी https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा IHLMS 2.0 मोबाइल ॲप (Android आणि iOS) वरून अर्ज करावा.

ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असून, कोणताही एजंट, दलाल किंवा सल्लागार नेमलेला नाही.

कोणत्याही तृतीयपक्षीय व्यक्ती किंवा संस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये, असा स्पष्ट इशारा म्हाडाने दिला आहे.

संपर्क व मदतीसाठी:

अर्ज करताना अडचण आल्यास, MHADA हेल्पलाइन क्रमांक – 022-69468100 वर संपर्क साधावा.

मुंबईसाठी दिवाळीत आणखी एक लॉटरी

कोकण मंडळाच्या या लॉटरीनंतर, मुंबईमध्ये सुमारे 5,200 घरांची आणखी एक लॉटरी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025 मध्ये, दिवाळीच्या सुमारास जाहीर होणार असल्याची माहिती म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery 2025 : घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या 5285 घरांसाठी लॉटरी, आजपासून करा अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल