TRENDING:

ठाण्यात एकाच ठिकाणी मिळते 10 पेक्षा अधिक प्रकारची पावभाजी, खवय्यांची होते मोठी गर्दी, लोकेशन काय?

Last Updated:

रेस्टॉरंटचे वातावरणसुद्धा अगदी शांत असल्याने इथे आल्यानंतर मन प्रसन्न होते. रेस्टॉरंटमध्ये असणारे सगळेच लोक आपुलकीने बोलतात. त्यामुळे इथे येणाऱ्या खवय्यांना कसलीच चिंता भासत नाही. बा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

ठाणे : महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणून पावभाजी प्रसिद्ध आहे. ठाण्यात सुद्धा पावभाजीचे प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. ठाण्यातली बाबा पावभाजी हे रेस्टॉरंट म्हणजे ज्यांना पावभाजी आवडते, त्यांच्यासाठी तर मेजवानीच आहे. ठाण्यात पाव भाजी कुणाची तर बाबा पावभाजीची, असे समीकरण ठरलं आहे. ठाण्यात असणारे बाबा पावभाजी हे रेस्टॉरंट वागळे इस्टेट इथे आहे. इथे पावभाजीचे एकूण 10 हुन अधिक प्रकार मिळतात.

advertisement

10 प्रकारची पावभाजी -

यात मसाला पाव, चीज मसाला पाव, पाव भाजी, चीज पाव भाजी, पनीर पावभाजी, चीज पनीर पावभाजी, तवा पुलाव, चीज तवा पुलाव असे 10 हून अधिक प्रकार पावभाजी मध्ये मिळतात. इथे मिळणाऱ्या पावभाजीची किंमत फक्त 150 रुपयांपासून सुरू होते.

रेस्टॉरंटचे वातावरणसुद्धा अगदी शांत असल्याने इथे आल्यानंतर मन प्रसन्न होते. रेस्टॉरंटमध्ये असणारे सगळेच लोक आपुलकीने बोलतात. त्यामुळे इथे येणाऱ्या खवय्यांना कसलीच चिंता भासत नाही. बाबा पावभाजीत पावभाजी सोबतच सँडविचमध्येही 10 हून अधिक प्रकार मिळतात.

advertisement

विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन, मलेशियात घुमला हरीनामाचा गजर, डोळे दिपवणारा सोहळा, VIDEO

यामध्ये मशरूम सँडविच, बार्बेक्यू पनीर सँडविच, बॉम्बे मसाला सँडविच, एक्झॉटिक व्हेजिटेबल क्लब सँडविच हे सँडविच उपलब्ध आहेत. यासोबतच बर्गर, पिझ्झा, पास्ता हे सुद्धा इथे चविष्ट मिळतात. खवय्यांना सगळ्या प्रकारच्या पावभाजी एकाच ठिकाणी मिळाव्यात, याच उद्देशाने सनी पावसकर यांनी यास बाबा पावभाजी रेस्टॉरंटची सुरुवात केली.

advertisement

इथे मिळणारे आईस्क्रीमसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. यात सिझलिंग वोलनेट ब्राउनी ही अतिशय लोकप्रिय आहे. आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये श्रावण फूड स्पेशल म्हणजे उपवासाचे पदार्थ सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे श्रावण आज जर तुम्हाला चविष्ट शाकाहारी पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर इथे नक्की जाऊ शकता.

सणासुदीच्या काळात वाढले खाद्यतेलाचे भाव, सध्या असे आहेत छत्रपती संभाजीनगरमधील दर, व्यापारी काय म्हणाले?

advertisement

'आमच्या बाबा पावभाजीमुळे मिळणारी पावभाजी ही ठाण्यात खूप प्रसिद्ध आहे. इथे येणारे खवय्ये पावभाजी खाल्ल्याशिवाय जातच नाहीत. आम्ही रेस्टॉरंट मध्ये कोणताही पदार्थ बनवताना स्वच्छता ठेवतो,' असे बाबा पावभाजी रेस्टॉरंटचे मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या संतोष यादव यांनी सांगितले. जर तुम्हालाही पावभाजीचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायचे असतील तर नक्की ठाण्याच्या या बाबा पावभाजीला नक्की भेट देऊ शकतात.

मराठी बातम्या/मुंबई/
ठाण्यात एकाच ठिकाणी मिळते 10 पेक्षा अधिक प्रकारची पावभाजी, खवय्यांची होते मोठी गर्दी, लोकेशन काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल