एमएमआरडीए गेल्या काही महिन्यांपासून या पुलाच्या कामासाठी हालचाली करत आहे. मात्र स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध असल्यामुळे हे काम अद्याप सुरू होऊ शकले नव्हते. आता गणेशोत्सवानंतर प्रत्यक्ष पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात नवी मुंबई ते मुंबई विशेष बससेवा, NMMT ची शेवटची बस कधी?
advertisement
प्रशासनाच्या या निर्णयाला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. रहिवाशांचा आरोप आहे की, अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न लागता प्रशासन पूल पाडत आहे. हाजी बुरानी इमारतीतील रहिवासी मुनाफ पटेल यांनी सांगितले की “पुनर्वसन न करता पूल पाडणे हा अन्याय आहे. आम्ही रस्त्यावर उतरू आणि पूल बंद होऊ देणार नाही.”
या वादात आता राजकीय पक्षही उतरले आहेत. मनसे वाहतूक सेनेने घोषणा केली आहे की मनसे तसेच शिवसेना (ठाकरे गट) यांचे कार्यकर्ते रहिवाशांसोबत आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी प्रशासनाला योग्य पुनर्वसन योजना तयार न करता पूल पाडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक, दुकानदार आणि वाहनचालक यांच्यातही या कामाबाबत चिंता आहे. पूल बंद झाल्यास वाहतुकीवर मोठा परिणाम होईल. तसेच पर्यायी मार्गांचीही माहिती दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.






