Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात नवी मुंबई ते मुंबई विशेष बससेवा, NMMT ची शेवटची बस कधी?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ganeshotsav 2025: श्री गणेशाच्या मूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी नवी मुंबईतून अनेक भक्त मुंबईला जातात. त्यांच्या सेवेसाठी खास बससेवा सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई: मुंबईचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. या गणेशोत्सवाच्या काळात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक मुंबईत येत असतात. तसेच नवी मुंबई परिसरातून देखील मुंबईत जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. याच गणेशभक्तांच्या सोयीसाठी 10 दिवस एनएमएमटीमार्फत विशेष बससेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती एनएमएमटीचे मुख्य वाहतूक अधिकारी सुनिल साळुंखे यांनी दिली.
अशी असेल बससेवा
सीबीडी बस स्थानक ते हिंदमाता दादर पहिली बस रात्री 8.25 वाजता असेल तर शेवटची बस रात्री 1.40 वाजता असेल. हिंदमाता दादर ते सीबीडी रात्री 10 वा. तर शेवटची बस 3.10 वा. असेल. घणसोली / घरोंदा ते हिंदमाता दादर पहिली बस रात्री 9 वाजता, तर शेवटची बस 2.25 वाजता सुटेल. हिंदमाता दादर ते घणसोली / घरोंदा रात्री 10.30 वाजता पहिली तर 3.50 वाजता शेवटची बस असणार आहे.
advertisement
दरम्यान, गणेशोत्सवात मुंबईमध्ये मोठमोठ्या गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. तसेच सुंदर देखावे देखील सादर केले जातात. श्री गणेशाच्या मूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी नवी मुंबईतून अनेक भक्त मुंबईला जातात. त्यांच्या सोईसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत विशेष बस चावलण्यात येणार आहे.
advertisement
नवी मंबईच्या घणसोली/घरोंदा व सीबीडी बस स्थानक येथून दादर/हिंदमातासाठी रात्री 8 पासून दर दीड तासाच्या अंतराने पहाटे 3.50 वाजेपर्यंत ही विशेष बससेवा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गणेशोत्सवाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी विशेष बस सेवेचा लाभ गणेशभक्तांनी घ्यावा, असे आवाहन एनएमएमटीच्या वतीने करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
August 27, 2025 10:46 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात नवी मुंबई ते मुंबई विशेष बससेवा, NMMT ची शेवटची बस कधी?


