TRENDING:

Mumbai Crime : मध्यस्थी पडली महागात! पती-पत्नीचा वाद मिटवणाऱ्या भावावर सपासप वार; 26 जानेवारीला हॉटेलबाहेर गाठलं अन्...

Last Updated:

Mumbai Crime News : आपल्या घरात दुसऱ्याने हस्तक्षेप केलेला आरोपींच्या पचणी पडला नाही. याच वादाचे रुपांतर पुढं एका भीषण गुन्ह्यात झाले असून, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही रक्तरंजित घटना घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Crime News : घरातला वाद घरातल्या घरात रहावा अशी भारतीय मानसिकता सर्वांची असते. त्यामुळे बाहेरचा माणूस घरच्या भांडणात व्यक्त होत असेल तर अनेकांना ते पटत देखील नाही. अशातच आता भिवंडीत कौटुंबिक वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील भांडण सोडवल्याचा राग मनात धरून तीन सख्ख्या भावांनी मिळून एका 23 वर्षीय तरुणाचा जीव घेतला आहे.
Mumbai Crime brother who tried to resolve dispute
Mumbai Crime brother who tried to resolve dispute
advertisement

शांतीनगर परिसरातील न्यू आझाद नगर झोपडपट्टी भागात ही घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आसीफ शहा याचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी मृत तरुणाचा मावस भाऊ मध्यस्थी करत होता.

मात्र, आपल्या घरात दुसऱ्याने हस्तक्षेप केलेला आरोपींच्या पचणी पडला नाही. याच वादाचे रुपांतर पुढं एका भीषण गुन्ह्यात झालं असून, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही रक्तरंजित घटना घडली आहे. मृत दिलशाद मकबूल अहमद शहा हा निजामिया हॉटेलजवळ असताना आरोपी आसीफ, अलीहसन आणि मुझफ्फर या तिघा भावांनी त्याला गाठले. पूर्ववैमनस्यातून या तिघांनी संगनमत करून दिलशादवर लोखंडी सुऱ्याने सपासप वार केले. या हल्ल्यात दिलशाद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा वाढले, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपी भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आसीफ अब्दुलहकीम शहा, अलीहसन अब्दुलहकीम शहा आणि मुझफ्फर अब्दुलहकीम शहा अशी या आरोपींची नावे आहेत. भररस्त्यात झालेल्या या खुनामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : मध्यस्थी पडली महागात! पती-पत्नीचा वाद मिटवणाऱ्या भावावर सपासप वार; 26 जानेवारीला हॉटेलबाहेर गाठलं अन्...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल