रस्ते वाहतूक विस्कळीत
दादर, माटुंगा, सायन, अंधेरी, परळ, भायखळा, घाटकोपर, विक्रोळी, विद्याविहार, भांडूप आणि काळाचौकीसह अनेक भागांत कंबरेपर्यंत पाणी साचले आहे. काही ठिकाणी नागरिकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे, तर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंधेरी सबवे बंद ठेवण्यात आला आहे. अटल सेतूवर वाहनांची मोठी गर्दी झाली असून, प्रवाशांना प्रचंड ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील काही मुख्य रस्ते आणि ये-जा करण्याचे मार्ग पाण्यामुळे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
advertisement
Mumbai Red Alert: 24 तास धोक्याचे! मुंबईकर गरज असेल तरच बाहेर पडा, नवी मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
रेल्वे सेवेला मोठा फटका
मध्य रेल्वेच्या गाड्या सरासरी 20 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळी आंबिवली-शहाडदरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. हार्बर मार्गावरील लोकल्स सरासरी 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे सेवा सुरू असली तरी गाड्या सुमारे 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शाळा, परीक्षा व कार्यालये बंद
मुंबईसह मुंबई उपनगरातील परिस्थिती पाहता शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेने नागरिकांना शक्यतो घरीच राहण्याचे आवाहन केले असून खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
भरतीचा इशारा, प्रशासनाचे आवाहन
हवामान खात्याने आज मुंबई आणि उपनगरासाठी मोठ्या भरतीचा इशारा दिला आहे. सकाळी 9:16वाजता 3.75 मीटर उंच भरती आली असून रात्री 8:53वाजता पुन्हा 3.14 मीटर उंच भरती येणार आहे. त्याशिवाय दुपारी 3:16 वाजता 2.22 मीटर ओहोटी आणि उद्या (20 ऑगस्ट) पहाटे 3: 11 वाजता 1.05 मीटर ओहोटी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईत पहाटे 4 ते सकाळी 8 या चार तासांत मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरातील चिंचोली, वर्सोवा आणि दिंडोशी भागात 90 ते 107 मिमी पाऊस झाला, तर शहर भागात दादर, वडाळा आणि परळ परिसरात 8
89 ते 109 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात मुलुंड, चेंबूर आणि विक्रोळी परिसरात 87 ते 100 मिमी पाऊस झाला आहे.