TRENDING:

ऐन शिमग्याला भाडेवाढीची बोंब! कोकणात जाण्यासाठी दीडपट भाडे, गुजरातचा प्रवासही महाग

Last Updated:

Holi Special: होळी आणि धूलिवंदनासाठी मुंबईतून कोकण आणि गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. आता खासगी बसने जाणाऱ्या प्रवाशांना दीडपट भाडे द्यावे लागणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : होळी अगदी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. अशातच मुंबईहून अनेक चाकरमानी होळीला आपल्या गावी कोकणात जाण्यास प्राधान्य देतात. याच पार्श्वभूमीवर होळीनिमित्त कोकणात आणि गुजरातला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सनी खासगी बसच्या भाड्यात 8 ते 15 मार्च या कालावधीसाठी 30 ते 50 टक्के वाढ केली आहे. साध्या बसचे भाडे 700 रुपयांवरून वरून 1200 आणि एसी बसचे भाडे 2000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे ऐन होळीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
शिमग्यात ट्रॅव्हल्सची भरमसाठ भाडेवाढ....
शिमग्यात ट्रॅव्हल्सची भरमसाठ भाडेवाढ....
advertisement

होळी आणि धूलिवंदनासाठी मुंबईतून कोकण आणि गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. यंदा हे सण गुरुवारी आणि शुक्रवार म्हणजेच आठवड्याच्या शेवटी आले आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार असल्याचा अंदाज वाहतूकदारांनी व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे बसच्या संख्येत 15 ते 30 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे वाहतूकदारांनी सांगितले. एसटीच्या भाड्यापेक्षा दीडपट भाडे आकारणी करण्याची परवानगी ट्रॅव्हल्सना आहे. इतर वेळी एसटीपेक्षा कमी भाडे घेतले जाते. हे नुकसान हंगामात भरून काढण्यासाठी भाडेवाढ करण्यात करण्यात येते, असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे.

advertisement

गर्दीची चिंता सोडा, होळी आणि उन्हाळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष ट्रेन पकडा!

एसटी महामंडळाकडे बसची कमतरता

सणासुदीच्या काळात एसटी आणि रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, एसटीकडे गाड्या कमी आहेत. त्यामुळे प्रवाशांची वाढीव मागणी पूर्ण होत नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय नसतो. यंदा मुंबईहून रत्नागिरीला जाण्यासाठी साध्या बसचे 1100 तर विजयदुर्गला जाण्यासाठी 1300 इतके भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच सुरतला जाणाऱ्या साध्या बसला 1000, तर अहमदाबाद 1500 भाडे आकारण्यात येणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
ऐन शिमग्याला भाडेवाढीची बोंब! कोकणात जाण्यासाठी दीडपट भाडे, गुजरातचा प्रवासही महाग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल