गर्दीची चिंता सोडा, होळी आणि उन्हाळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष ट्रेन पकडा!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Holi Special Train: प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर होळी व उन्हाळ्याच्या निमित्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
मुंबई: उन्हाळा आणि होळीनिमित्त रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी असते. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या काळात पश्चिम रेल्वेकडून विविध मार्गांवर विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईहून दिल्ली, रीवा, बिकानेर, खातिपुरा आणि पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई-दिल्ली सुपरफास्ट एसी ट्रेन
प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल ते दिल्लीदरम्यान आठवड्यातून दोन वेळा सुपरफास्ट एसी स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. होळी तसेच उन्हाळी हंगामातील वाढती मागणी लक्षात घेऊन ही विशेष गाडी 7 मार्चपासून 28 मार्चपर्यंत धावेल. मुंबई सेंट्रलहून ही ट्रेन दर मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता दिल्लीला पोहोचेल. तर, दिल्लीहून ही सुपरफास्ट स्पेशल दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी 1:05 वाजता मुंबईसाठी सुटेल.
advertisement
बांद्रा टर्मिनस – रीवा विशेष ट्रेन
पश्चिम रेल्वेने बँद्रा टर्मिनस – रीवा आणि रीवा – बांद्रा टर्मिनस दम्यान विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. ही विशेष ट्रेन 06 मार्च 2025 ते 26 जून 2025 या कालावधीत धावेल. बँद्रा टर्मिनस – रीवा (गाडी क्रमांक: 09001) ही गाडी बांद्रा टर्मिनसहून पहाटे 04:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 07:00 वाजता रीवा येथे पोहोचेल. या ट्रेनला बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, उधना, भरुच, वडोदरा, आनंद, साबरमती, मेहसाणा, पालनपूर, आबू रोड, फालना, मारवाड, ब्यावर, अजमेर, किशनगड आणि जयपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीत AC 2 टायर आणि AC 3 टायर डबे असणार आहेत. या गाडीचे आरक्षण IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर आणि सर्व PRS काउंटरवर उपलब्ध आहे.
advertisement
याचप्रमाणे रीवा – बांद्रा टर्मिनस (गाडी क्रमांक: 09130) ही विशेष गाडी 07 मार्च 2025 ते 27 जून 2025 या कालावधीत धावेल. रीवाहून ही गाडी सकाळी 11:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता बँद्रा टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला देखील बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, उधना, भरुच, वडोदरा, आनंद, साबरमती, मेहसाणा, पालनपूर, आबू रोड, फालना, मारवाड, ब्यावर, अजमेर, किशनगड आणि जयपूर या स्थानकांवर थांबे असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी यातही AC 2 टायर आणि AC 3 टायर डबे असणार आहेत. या ट्रेनचे तिकीट बुकिंग IRCTC आणि सर्व PRS काउंटरवर सुरू झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 06, 2025 9:46 AM IST