125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम अर्धवट
वरळी–शिवडी उन्नत मार्गासाठी 125 वर्षांचा ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल हटविणे आवश्यक आहे. पुलाच्या पूर्व-पश्चिम दिशेतील भाग आधीच काढण्यात आला असला तरी रेल्वे मार्गावरील संरचना गेल्या महिन्याभरापासून हटवता आलेली नाही. ‘महारेल’ने नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच महाकाय क्रेन उभ्या करून पाडकामाची तयारी केली, मात्र ब्लॉक न मिळाल्याने त्या निष्क्रिय राहिल्या आहेत.
advertisement
Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपून वापरा, 11 विभागातील पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं?
महारेल–मध्य रेल्वे बैठकीत निर्णय
उच्चस्तरीय चर्चेनंतर मध्य रेल्वेने एकूण आठ ब्लॉक मंजूर करण्यास सहमती दर्शवली—
1 ब्लॉक : सलग 18 तासांचा
7 ब्लॉक : रात्री 12 ते 3 या वेळेत प्रत्येकी 2 तासांचे
या ब्लॉकचे नेमके वेळापत्रक मध्य रेल्वे लवकरच जाहीर करणार असून, प्रवाशांना त्याची आगाऊ माहिती दिली जाईल.
लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम
या ब्लॉकमुळे लोकल तसेच मेल–एक्स्प्रेस गाड्यांची सेवा दिवसरात्र विस्कळीत होणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ब्लॉकचे नियोजन काळजीपूर्वक केले जाणार आहे. मध्य रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार असून, अंतिम मान्यता मिळाल्यावरच प्रत्यक्ष पाडकाम सुरू होणार आहे.
पाडकाम सुरू होण्यासाठी अजून 15-20 दिवस
मान्यता प्रक्रियेमुळे एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम हाती घेण्यासाठी किमान 15 - 20 दिवस अतिरिक्त लागण्याची शक्यता आहे. यामुळे जागेवर निष्क्रिय उभ्या असलेल्या महाकाय क्रेनच्या लाखो रुपयांच्या भाड्याचा बोजा ‘महारेल’वर वाढत चालला आहे.






