Eknath Shinde BJP महायुतीत खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेला धक्का, शिंदेंच्या शिलेदाराविरोधात चौकशी समिती

Last Updated:

Ekanth Shinde : भाजपकडून शिंदे गटाला चांगलेच अडचणीत आणले जात आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

महायुतीत खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेला धक्का,  शिंदेंच्या शिलेदाराविरोधात चौकशी समिती
महायुतीत खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेला धक्का, शिंदेंच्या शिलेदाराविरोधात चौकशी समिती
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. भाजपकडून शिंदे गटाला चांगलेच अडचणीत आणले जात आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट चांगलेच अडचणीत सापडले आहेत. भूखंड भ्रष्टाचार प्रकरणी आता चौकशी समिती स्थापन झाली आहे. या प्रकरणी काही महिन्यांपासून शिरसाटांवर आरोप सुरू होते. मात्र, आता चौकशी समिती स्थापन करण्याच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या ४,५०० कोटींच्या कथित सिडको जमीन घोटाळ्याची गंभीर दखल अखेर राज्य सरकारने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण समोर आणत शिरसाटांवर आरोप केले होते. त्यानंतर आता शिरसाट यांनी हे आरोप फेटाळत रोहित पवारांवर पलटवार केला होता. आता, सरकारने अधिकृत चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे.
advertisement

चौकशी समितीत कोणाचा समावेश?

चौकशी समितीचे अध्यक्ष हे कोकण विभागीय आयुक्त असणार आहेत. तर मुख्य वन संरक्षक (ठाणे), जिल्हाधिकारी (रायगड), सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, मुख्य भूमी आणि भूमापन अधिकारी (ठाणे आणि रायगड) हे अधिकारी समितीमध्ये सदस्य असणार आहेत.

मुख्य सचिवांनी प्रशासनाला झापलं....

या कथित जमीन घोटाळा प्रकरणी वन विभागाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिना-दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर या दिरंगाईवर 'सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी'ने (CEC) यावर बोट ठेवले. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी 24 नोव्हेंबर रोजी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलिस आणि प्रशासनाला झापलं आणि तत्काळ ही चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement

शिरसाटांच्या अडचणीत भर...

या चौकशी समितीच्या स्थापनेमुळे संजय शिरसाट यांच्या अडचणीत भर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी देखील संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ क्लिप जाहीर करत शिरसाट यांच्याकडे रोकड असलेली बॅग दाखवली होती. रोहित पवारांनी केलेल्या आरोपावर चौकशी समिती स्थापन झाली आहे. तर,  दुसरीकडे शिंदे गटात आणि भाजपात तणाव वाढत असताना चौकशी समिती स्थापन झाल्याने अनेक तर्क लढवले जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde BJP महायुतीत खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेला धक्का, शिंदेंच्या शिलेदाराविरोधात चौकशी समिती
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement