वांगणी-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाली. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने 4 लोकल आणि एक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. कर्जतहुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईकडे जाणारी वाहतूक 30 ते 35 मिनिटे उशिराने आहेत. ऐन सकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे.
advertisement
बदलापूर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. बिघाड लक्षात आल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तर, दुसरीकडे रेल्वे उशिराने असल्याने प्रवाशांची गर्दी उसळली. कर्जतच्या दिशेने असणारी अप-डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकडे कामावर येणाऱ्या प्रवाशांची स्थानकांवर गर्दी झाली. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर काही लोकल वाहतूक पूर्वपदावर येण्यास वेळ जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ऑफिसमध्ये लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.