TRENDING:

Mumbai Local ची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचं मोठं पाऊल, थेट 800 कार्यालयांना विनंतीपत्र!

Last Updated:

Mumbai Local: मुंबईतील लोकलची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेनं मोठं पाऊल उचललं आहे. थेट सरकारी आणि खासगी 800 कार्यालयांना विनंतीपत्र लिहिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईची लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. विभागात दिवसाला 1810 लोकर फेऱ्यातून 35 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मुंबईतील लोकल प्रवास सर्वात स्वस्त, जलद आणि लोकप्रिय वाहतूक सेवा असल्याने नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र ही गर्दीच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका ठरत आहे. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून सुमारे 800 कार्यलायांना पत्र लिहिले आहे. यामध्ये कार्यालयीन वेळांमध्ये लवचिकता आणण्याची विनंती करण्यात आली आहे.
Mumbai Local: मुंबईत लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचं मोठं पाऊल, थेट 800 कार्यालयांना विनंतीपत्र!
Mumbai Local: मुंबईत लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचं मोठं पाऊल, थेट 800 कार्यालयांना विनंतीपत्र!
advertisement

मुंबईत रोज सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयात जाण्यासाठी आणि कार्यालयातून घरी परतण्याच्या वेळेत लोकलला मोठी गर्दी होते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. विशेषत: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे परिसरातील विविध सरकारी आणि खासगी कार्यालये यांच्या वेळांत नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी होणारी प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी गर्दीचे विभाजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यालयीन वेळांत बदल करण्याची आवश्यकता पत्रात नमूद करण्यात आलीये.

advertisement

Pune - Nashik Expressway: नाशिक-पुणेकरांसाठी गुडन्यूज! प्रवास होणार फक्त 3 तासात

कार्यालयीन वेळेत बदल करण्याची विनंती

मुंबईत रोज सकाळी 8 ते 10 या वेळेत लोकलला मोठी गर्दी होते. तर सायंकाळी 5 ते 7 ही वेळ देखील गर्दीची असते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, विविध महामंडळे, बँका, महापालिका, महाविद्यालये इत्यादींनी त्यांच्या कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने बदल करावा, अशी विनंती मध्य रेल्वेच्या पत्रातून करण्यात आली आहे.

advertisement

नव्या मार्गिका अशक्य

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. स्वस्तातला पर्याय म्हणून लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. लोकलसेवा सुधारण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी नवीन रेल्वे मार्गिका हा पर्याय ठरू शकतो. मात्र, सीएसएमटी ते कल्याणपर्यंत नवी मार्गिका टाकण्यासाठी जागेची कमतरता आहे. जागाच उपलब्ध नसल्याने लोकलसेवा वाढवणे तांत्रिक दृष्टीने शक्य होणार नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळेत बदल केल्यास गर्दीचे व्यवस्थापन करणे शक्य होईल आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असं पत्रात म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local ची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचं मोठं पाऊल, थेट 800 कार्यालयांना विनंतीपत्र!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल