मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप-सोनापूर जंक्शनवरील वाहतूक 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेपासून 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत, तसेच 2 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजेपासून 3 नोव्हेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहील. या काळात केवळ आपत्कालीन वाहने यांनाच मार्गावरून जाण्याची परवानगी दिली जाईल. जर काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही तर 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी पुन्हा हाच मार्ग बंद ठेवण्याची शक्यता आहे.
advertisement
ठाणेकरांसाठी गुड न्यूज! 12200 कोटींच्या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होणार, प्लॅन काय? स्टेशन कुठं?
याशिवाय मेट्रो-4 च्या पुढील कामासाठी एलबीएस रोडवरील एक लेन 3 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करणे गरजेचे आहे.
पर्यायी मार्गांची व्यवस्था:
पवई आणि जेवीएलआर (JVLR) वरून एलबीएस रोडमार्गे मुलुंडकडे जाणाऱ्या वाहनांनी मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडशी जोडणाऱ्या मार्गाचा वापर करावा.
मुलुंड (पश्चिम) येथून पूर्वेकडील भागात किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) कडे जाणाऱ्या वाहनांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करावा.
कांजुरमार्ग आणि भांडुप (पश्चिम) येथून एलबीएस रोडमार्गे मुलुंड (पूर्व) किंवा (पश्चिम) कडे जाणाऱ्या वाहनचालकांना भांडुप पोलिस स्टेशन, कल्पना चावला चौक आणि मधुबन गार्डन परिसरात वाहतूक मर्यादांचा सामना करावा लागेल.
दरम्यान, या कालावधीत शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मेट्रो-4 चे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होईल असे पोलिसांनी नमूद केले आहे.






