मुंबई लगत असणाऱ्या आणि वीकेंडसाठी प्रसिद्ध अशा अलिबागचे प्रवेशद्वार असलेल्या मांडवा दरम्यान दररोज रो-रो (रोल-ऑन, रोल-ऑफ) सेवा चालवली जाते. हीच एमटूएम फेरीज आता मुंबई-गोवा सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. “आमचे रोपॅक्स जहाज मुंबई-गोवा प्रवास साडेसहा तासांत पूर्ण करू शकते आणि सोबतच प्रवासी आणि वाहन यांना घेऊन जात सुद्धा प्रवास करता येऊ शकतो,” असं एमटूएम या फेरीजचं म्हणणं आहे.
advertisement
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! मिठी नदीखालून धावली मेट्रो, कधी सुरू होणार प्रवास?
“आमच्याकडे एक नवीन जहाज आहे, जे आम्ही इटलीहून आणले आहे. हे जहाज मुंबईतील ड्राय डॉकमध्ये आहे आणि पुढील महिन्यात ते बाहेर पडेल," असे एमटूएम फेरीजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की कंपनी मुंबईतील माझगाव येथील फेरी व्हार्फ ते गोव्यातील मोरमुगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) पर्यंत मुंबई-गोवा रोपॅक्स जहाज सेवा चालवण्याची योजना आखत आहे. ही योजना यशस्वीरित्या पूर्ण झाली तर मुंबईकरांना गोव्यात त्यांच्या प्रायव्हेट गाड्या घेऊन जाता येणार आहेत.
620 प्रवासी आणि 60 गाड्या
कंपनीच्या रोपॅक्स जहाजात 620 प्रवासी आणि 60 गाड्या वाहून नेण्याची क्षमता आहे. मुंबई-गोवा रोपॅक्स सेवा ही भारतातील अशा प्रकारची पहिलीच सेवा नाही. गुजरातमधील हजिरा आणि घोघा दरम्यान अशीच एक सेवा चालते, तर एमटूएम फेरीज मुंबईतील फेरी व्हार्फ आणि रायगडमधील मांडवा दरम्यान दिवसातून तीन वेळा ही सेवा चालवते. गोव्यासारख्या ठिकाणी मुंबईकर अनेकदा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जातात. त्यामुळे रोपॅक्स या जहाजाला परवानगी मिळाली तर अनेक मुंबईकरांसाठी ती आनंदाची पर्वणीच असेल.






