मोरा बंदरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून समुद्राची ओहोटी सुरू होताच पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाते. अशा स्थितीत प्रवासी लॉन्च जहाजे धक्क्यापर्यंत येणे धोकादायक ठरते. परिणामी प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक थांबवण्याशिवाय पर्याय राहत नाही. बंदर निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसाच्या पहिल्या सत्रातील वाहतूक सुरळीत राहील मात्र दुपारनंतर ओहोटीची तीव्रता वाढल्याने सेवा बंद ठेवावी लागणार आहे.
advertisement
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचं खास नियोजन, दादरपर्यंत स्पेशल रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक आलं समोर
मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मोठ्या यंत्रसामुग्रीद्वारे नियमित साफसफाईची कामेही करण्यात आली. तरीही साचलेल्या गाळाची समस्या कायम राहिल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रवासी वाहतूक हा उरण–मुंबई दरम्यान हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा दुवा आहे.
सध्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना सकाळच्या सत्रातील उपलब्ध सेवांचा पर्याय स्वीकारावा तसेच बंदर प्रशासनाकडून जारी होणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.






