या भागात पाणीपुरवठा बंद
मुंबईतील लाल बहादूर शास्त्री मार्गालगतचा परिसर, जवाहरलाल नेहरू मार्ग, देवीदयाल मार्ग, डंपिंग रोड, डॉ. आर.पी.मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एमजी रोड, एन. एस. मार्ग, एस.एन.मार्ग, आर.एच. बी. मार्ग, वालजी मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी.आर.मार्ग, लाढा मार्ग, व्ही. पी.मार्ग, मदन मोहन गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
महापालिकेचे आवाहन
21 ऑगस्ट रोजी एक जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम सकाळी 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत करण्यात येईल. या कामामुळे रहिवाशांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे. तसेच पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर किमान 4 ते 5 दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे.