धरणांमध्ये 99.46 टक्के साठा
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत सर्व धरणांत मिळून एकूण 14 लाख 39 हजार 588 दशलक्ष लिटर पाणी साठले आहे. ही क्षमता म्हणजेच 99.46 टक्के इतकी होते. सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतकी आहे. या जलसाठ्यातून मुंबईला रोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
advertisement
Godavari Flood: गोदामाय कोपली, जालन्यात 10 हजार नागरिकांना सोडावं लागलं घर, PHOTOS
कोणती धरणे किती भरली?
तुळशी धरण – 100%
विहार धरण – 100%
तानसा धरण – 91.91%
मोडकसागर धरण – 100%
अप्पर वैतरणा धरण – 99.58%
मध्य वैतरणा धरण – 98.96%
भातसा धरण – 99.35%
यातील तुळशी, विहार, तानसा आणि मोडकसागर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उर्वरित तीन धरणेही जवळपास शंभर टक्के क्षमतेच्या जवळ पोहोचली आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक समाधानकारक स्थिती
गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये 99.44 टक्के पाणी साठा होता. यंदा तो 99.46 टक्के इतका आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही. विशेष म्हणजे, यावर्षी पावसाळ्यात महापालिकेकडून पाणीकपात लागू करण्यात आलेली नव्हती.
1 ऑक्टोबरची महत्त्वाची तारीख
महापालिकेच्या नियमांनुसार, जर 1 ऑक्टोबरला धरणांमध्ये शंभर टक्के साठा असेल तर पुढील पावसाळा येईपर्यंत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ती स्थिती पूर्ण समाधानकारक मानली जाते. यंदा सर्व धरणांत साठा जवळपास शंभर टक्के असल्यामुळे मुंबईकरांना पुढील वर्षभर पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पाणीपुरवठा सुरळीत
सध्या मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या साठ्यामुळे ही व्यवस्था अव्याहत सुरू राहणार आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई किंवा कपातीची चिंता करण्याची गरज नाही, असे स्पष्ट महापालिकेने केले आहे.