नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास केला जात आहे. या प्रकल्पावर सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक आवश्यक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. सिडकोतर्फे 1160 हेक्टरवर विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रती वर्ष 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष टन माल वाहतुकीकरिता नियोजित आहे. अंतिम टप्प्यात विमानतळाची प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता 90 दशलक्ष आणि माल वाहतूक क्षमता 2.6 दशलक्ष टन असणार आहे.
advertisement
मुंबई ते गोवा फक्त साडेसहा तासांत! लवकरच RoPAX सेवा, आता कारसह करायचा समुद्र प्रवास
या दिवशी पहिलं व्यावसायिक उड्डाण
विमानाचे टेक ऑफ आणि लॅण्डिंगचीही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यानुसार 17 एप्रिलपासून नवी मुंबई विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आणि 3 नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक फैज अहमद किडवई यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत विमानतळाच्या कामांचा दिवसभर आढावा घेतला. यावेळी नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश 3 निकम, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आदी उपस्थित होते.
मूल्यमापन चाचणी
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विमानतळाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले.विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सी वे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हँडलिंग सिस्टीम आदी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.