Navi Mumbai Municipal Election 2026 : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सूरूवात झाली आहे.या निवडणूकीत आपल्या वॉर्डमधून कोणता उमेदवार उभा आहे? तो उच्चशिक्षित आहे का?अशी अनेक प्रश्न उमेदवारांना पडत असतात. त्यात नवी मुंबईत 36 वकील, 16 अभियंते आणि 6 डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
advertisement
नवी मुंबईच्या 28 वॉर्डमधील 111 जांगावर निवडणूक पार पडणार असून 499 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 201 जणांनी पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. तर तीन जणांचे शिक्षणच झालेले नाही आहे. यामध्ये 20 उमेदवारांचे पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. तर 151 उमेदवारांचे सहावी ते दहावी शिक्षण पुर्ण झालेले आहे.
महापालिका निवडणूकीत 124 उमेदवार असेही आहेत ज्यांचं अकरावी ते बारावी शिक्षण पूर्ण झालेले आहे. तसेच 113 उमेदवार हे तेरावी ते पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले आहेत. पदव्यूत्तर 88 उमेदवार आहेत.
तसेच या निवडणुकीत अनेक उच्चशिक्षित उमेदवारांना देखील तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे 36 वकील देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.16 अभियंते आहेत. 6 डॉक्टर देखील उमेदवार आहेत. पीएच डी केलेले 3 उमेदवार आहेत. आणि एमबीए केलेले 11 उमेदवार आहेत. तर विदेशातून पदवी घेतलेले 2 उमेदवार आहेत. दरम्यान इतके उच्चशिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मतदारांसमोर कुणाला निवडून द्यायचं हा मोठा प्रश्न असणार आहे.
