मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. आज सोमवारी मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईतून जाण्यासाठी निर्देश दिले आहे. त्यानंतर जरांगे यांच्या वकिलांनी आझाद मैदानात जाऊन भेट घेतली आणि माहिती दिली. त्यानंतर जरांगे यांनी मराठा बांधवांना आवाहन केलं. तसंच एक वेगळा संशयही व्यक्त केला.
'मी लेकरा बाळांसाठी कष्ट सहन करतो. तुम्हाला आरक्षण देऊन मोठं करायचं आहे म्हणून उपोषण करतोय, मलाा पाणी पिऊन तुमच्याशी बोलावं लागतंय तर काय उपोय आहे. तुम्हाला वारंवार का सांगावं लागत आहे. तुम्हाला जेव्हा बाहेर निघायचं आहे तेव्हा गाड्या घेऊन निघा. मला वाटतं अंतरावलीमध्ये हीच पोरं होती. आता मुंबईतही हीच पोरं आहे, ते इतरांना त्रास देत नाही. मीडिया सुद्धा सोबत आहे. मीडियाला त्रास झाला आहे, हे ऐकू येत आहे, त्यामुळे आम्हाला संशय येतोय. हे काही तरी षडयंत्र आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी हे काम सुरू आहे. रस्त्यावर देखील ही पोरं आहे. कुठल्या तरी राजकीय नेत्यांचं ऐकून ही लोक रस्त्यावर उतरली आहे. ही फक्त आंदोलनामुळे गप्प आहे. तू अंतरवालीमध्ये हेच केलं होतं, आता मुंबईतही तेच केलं. मुक मोर्चा काढला तेव्हाही हेच केलं होतं. तुला आम्ही चांगलं ओळखून आहे. तू माझ्या नांदाला लागू नको, जर मागे लागलो तर मी खुटा उपटीत असतो. माझी जात मला पुढे न्यायाची आहे. तुला चांगलं किती माहित आहे मी विचित्र आहे. तू आधी किती भिकारी होता हे मला सगळं माहित आहे' असा इशाराही जरांगेंनी दिला.
advertisement
कुणाला त्रासही होईल असं वागू नका
'जेवढे मुंबईत आले आहे, त्यांनी आपल्या गाड्या आल्या आहेत, त्या गाड्याा मैदानात लावा, हे माझं शेवटचं सांगणं आहे. जर तुम्हाला आरक्षण नको असेल आणि कुणाचं ऐकून गोंधळ घालायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावाला जाऊ शकतात. मला माझ्या जातीला आणि जातीच्या लेकराला मोठं करायचं आहे. हे बोलण्यासाठी पाणी प्यायवं लागलं आहे. तुमच्यामध्ये बुद्धी असेल तर मला किती वेदना आहे, हे समजून घ्या.त्यामुळे मला परत परत ते बोलायला लावू नका. मैदानात गाड्या लावा तिथेच निवांत झोपा, अख्ख्या मुंबईला जेवण पुरेल इतरं जेवण आलं आहे. गरीब मराठ्यांनी पाठवलं आहे. कुणाला त्रास होईल वागू नका.
'नाहीतर गावी जा'
एकट्या मराठ्याची ५ ते ६ जणांची ताकद आहे. आपल्याला त्रास झाला तर महाराष्ट्र भरातून अन्न आलं आहे. त्यामुळे मैदानात जा, पण न्यायालयाच्या नियमाचं पालन करा, मुंबईकरांना त्रास होणार नाही, असं वागा. फार काही लांब तुम्ही जात नाही. ग्राऊंडवर जाऊन झोपा. तुम्ही सगळे शांत राहा. आणि ज्यांना माझं ऐकायचं नाही त्यांनी गावी जा. मी मेलो तरी इथून हलणार नाही, गोळ्या घेऊन येऊ दे, मी मरायला तयार आहे, फक्त तुम्ही शांत राहा. आता लगेच स्पीडने गाड्या काढा, मैदानावर घेऊन जा. ज्या ज्या मैदानात जागा असेल तिथे जाऊन थांबा. सरकारने पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. कुणीही रस्त्यावर गाड्या लावू नका, असं आवाहनही जरांगेंनी केलं.
'सरकारने चर्चेला यावं'
'सरकारने चर्चा करतंय बैठका करतंय हे मी तुमच्याकडून ऐकतोय. ते नुसत्या बैठका घेता आहे. मी चर्चा करायला तयार आहे. पण, सरकारचे काय पाय मोडले आहे. आम्हीच चर्चाला यावं. तुम्ही सुद्धा चर्चेला येऊ शकतात. १५० मिटर अंतरावर चर्चा करण्यासााठी येता येत नाही का? शांतता किती कठीण आहे हे त्यांना अजून कळत नाही. दोन जणांचा बळी गेला आहे. शांततेचं महत्त्व देवेंद्र फडणवीस यांना कळत नाही, मस्तीखोर निर्णयामुळे मराठ्यांना तुच्छतेनं वागणूक दिली जात आहे.