पीएम मोदींकडून उद्घाटन 30 सप्टेंबरला
या प्रकल्पाचा आरे ते वरळी हा 22.46 किमीचा भाग आधीच सुरू आहे. मात्र आता वरळी ते कफ परेड या 10.99 किमीच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या वरळी NSCI अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 सप्टेंबर रोजी या टप्प्याचे उद्घाटन करतील. त्यामुळे कुलाबा ते आरेपर्यंतचा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल.
advertisement
Mumbai Local : मुंबई लोकलचा कायापालट होणार, कशी असणार डब्ब्यांची संरचना ?
एका तासात पूर्ण होईल प्रवास
ॲक्वा लाइन ही मुंबईत पहिली भूमिगत मेट्रो आहे. यामध्ये अखेरच्या टप्प्यात 11 नवे स्टेशन जोडले जात असून, संपूर्ण मार्गावर 27 स्टेशन त्यापैकी 26 स्टेशन भूमिगत असतील. या कॉरिडॉरमुळे कुलाबा ते आरे कॉलनी प्रवास एका तासाच्या आत होणार आहे. रस्त्याने लागणारे दोन ते तीन तास आता मोठ्या प्रमाणात वाचतील.
सुरक्षा तपासणी व ट्रायल रन
मेट्रो रेल्वे सेफ्टी आयुक्तांनी (CMRS) अंतिम टप्प्याची तपासणी केली असून एप्रिलपासून ट्रायल रन सुरू आहेत. सर्व सुरक्षा परवानग्या मिळाल्यानंतर आता अधिकृत उद्घाटन होणार आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी या मार्गाचं 7 ऑक्टोबर 2025 रोजी उद्घाटन करण्यात आलं. तर बीकेसी ते वरळी या मार्गाचं 9 मे 2025 मध्ये उद्घाटन झालं होतं. आरे ते बीकेसी आणि बीकेसी ते वरळी हे दोन्ही मिळून आता संपूर्ण मेट्रो-3 लाइन 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल.