Mumbai Metro: तीन तासांचा प्रवास फक्त 60 मिनिटांत, PM मोदी करणार मेट्रो-3 चं उद्घाटन, मुहूर्त कधी?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Metro: बहुप्रतिक्षित मेट्रो 3 ॲक्वा लाईन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे जाणाऱ्या प्रवासाला नवी गती मिळणार आहे. कुलाबा ते आरेपर्यंत धावणारी 33.5 किलोमीटर लांबीची मेट्रो-3 (ॲक्वा लाईन) लवकरच पूर्णपणे सुरू होणार असून यामुळे दररोज लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांसाठी मेट्रो 3 सेवेत दाखल होणार आहे.
पीएम मोदींकडून उद्घाटन 30 सप्टेंबरला
या प्रकल्पाचा आरे ते वरळी हा 22.46 किमीचा भाग आधीच सुरू आहे. मात्र आता वरळी ते कफ परेड या 10.99 किमीच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या वरळी NSCI अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 सप्टेंबर रोजी या टप्प्याचे उद्घाटन करतील. त्यामुळे कुलाबा ते आरेपर्यंतचा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल.
advertisement
एका तासात पूर्ण होईल प्रवास
ॲक्वा लाइन ही मुंबईत पहिली भूमिगत मेट्रो आहे. यामध्ये अखेरच्या टप्प्यात 11 नवे स्टेशन जोडले जात असून, संपूर्ण मार्गावर 27 स्टेशन त्यापैकी 26 स्टेशन भूमिगत असतील. या कॉरिडॉरमुळे कुलाबा ते आरे कॉलनी प्रवास एका तासाच्या आत होणार आहे. रस्त्याने लागणारे दोन ते तीन तास आता मोठ्या प्रमाणात वाचतील.
advertisement
सुरक्षा तपासणी व ट्रायल रन
मेट्रो रेल्वे सेफ्टी आयुक्तांनी (CMRS) अंतिम टप्प्याची तपासणी केली असून एप्रिलपासून ट्रायल रन सुरू आहेत. सर्व सुरक्षा परवानग्या मिळाल्यानंतर आता अधिकृत उद्घाटन होणार आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी या मार्गाचं 7 ऑक्टोबर 2025 रोजी उद्घाटन करण्यात आलं. तर बीकेसी ते वरळी या मार्गाचं 9 मे 2025 मध्ये उद्घाटन झालं होतं. आरे ते बीकेसी आणि बीकेसी ते वरळी हे दोन्ही मिळून आता संपूर्ण मेट्रो-3 लाइन 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 9:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: तीन तासांचा प्रवास फक्त 60 मिनिटांत, PM मोदी करणार मेट्रो-3 चं उद्घाटन, मुहूर्त कधी?