तामिळनाडूतील श्रीविल्लीपुथूर -मेधमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये नव्यानं शोधलेली ' निमास्पिस व्हॅनगॉगी' ही प्रजात आढळून आली आहे. तर दुसऱ्या पालीची प्रजात ही तामिळनाडूच्या विरुदुनगर जिल्ह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळून आली आहे. या पर्वाताच्या नावावरूनच या पालीचं नामकरण 'निमास्पिस सथुरागिरीएन्सिस' असे करण्यात आले आहे. तर 'निमास्पिस व्हॅनगॉगी' या पालीच्या प्रजातीचं नाव हे प्रसिद्ध चित्रकार वॅग गॉंग यांच्या नावावरू ठेवण्यात आलेलं आहे. या पालीच्या अंगावरील रंगसंगती ही वॅन गॉग यांच्या द स्टोरी नाईट या चित्राशी मिळतीजुळती असल्यामुळे या पालीला त्यांच्या नावावरून 'निमास्पिस व्हॅनगॉगी' असं नाव देण्यात आलं आहे. नव्यानं शोध लागलेल्या या पालीच्या दोन्ही प्रजाती दिनचर असून, छोटे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.
advertisement
गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचं महत्त्वाचं वैशिष्ट आहे, रंग, आकार, मांडीवरील ग्रंथीची रचना अशा काही गोष्टी या पालिंना इतर पालिंपेक्षा वेगळ्या ठरवतात. या कामगिरीसाठी ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनच्या संशोधकांचं कौतुक करण्यात येत आहे.