मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन नवीन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत:
1) वीकेण्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस – शनिवार आणि रविवारी ठराविक वॉर्ड ऑफिसमध्ये नोंदणी.
2) फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस – सोमवार ते शुक्रवार दरम्यान दररोजच्या नोंदणीपैकी 20 टक्के नोंदणी जलद प्रक्रियेसाठी राखीव.
advertisement
‘फास्ट ट्रॅक’ म्हणजे काय?
दररोज साधारण 30 विवाह नोंदणी होतात. त्यापैकी 6 नोंदण्या ‘फास्ट ट्रॅक’ सेवेत घेतल्या जातील. या अंतर्गत दाम्पत्यांना नोंदणी झाल्यानंतर त्याच दिवशी विवाह प्रमाणपत्र मिळेल. मात्र, या सेवेसाठी नियमित शुल्कासोबत 2,500 रुपयांचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
शनिवार-रविवार कुठे नोंदणी करता येईल?
शनिवारी सेवा देणारे वॉर्ड्स: A, C, E, F दक्षिण, G दक्षिण, H पूर्व, K पूर्व, P दक्षिण, P उत्तर, R मध्य, L, M पश्चिम, S.
रविवारी सेवा देणारे वॉर्ड्स: B, D, F उत्तर, G उत्तर, H पश्चिम, K पश्चिम, P पूर्व, R दक्षिण, R उत्तर, N, M पूर्व, T.
वेळापत्रक व मर्यादा
या सेवा शनिवार आणि रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत चालतील. मात्र, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
पालिकेचा उद्देश
मुंबईत दरवर्षी सुमारे 30 ते 35 हजार विवाहांची नोंदणी केली जाते. नागरिकांच्या अडचणी कमी करणे, प्रक्रिया सुलभ करणे आणि प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून देणे हा या नव्या उपक्रमामागचा उद्देश आहे. महापालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी सांगितले की, या दोन्ही सेवा येत्या रविवारपासून सुरू होतील. यामुळे नोंदणीची प्रक्रिया जलद आणि सोयीस्कर होईल, तसेच प्रमाणपत्र मिळण्यात होणारा उशीर टाळला जाईल.