पाटणा: बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी दोन्ही टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबर रोजी 121 मतदारसंघांमध्ये मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यात आज 11 नोव्हेंबर रोजी 122 जागांवर मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर विविध Exit Pollची आकडेवारी समोर येत आहे.
advertisement
बिहार निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुका आगामी अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. त्यामुळे बिहारची जनता कोणाला कौल देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या Exit Pollनुसार NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर महागठबंधन 73 ते 91 जागांवर आघाडीवर असल्याचे संकेत आहेत.
या Exit Pollनुसार एनडीएला 145 ते 160 जागा, तर विरोधकांच्या महागठबंधनला 73 ते 91 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेडीयूला 59 ते 68 जागा मिळतील. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 122 जागांची गरज आहे.
भाजपने 101 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी त्यांनी 72-82 जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला या ठिकाणी 74 जागा मिळाल्या होत्या. तर जेडीयूला 59 ते 68 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्यावेळी जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांच्या जागा वाढल्या आहेत.
विरोधकांच्या गटात आरजेडीला 146 पैकी 51 ते 63 जागा मिळू शकतील. गेल्या वेळी म्हणजेच २०२० मध्ये त्यांना 75 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने लढवलेल्या 59 पैकी फक्त 12 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना 19 जागा मिळाल्या होत्या.
