TRENDING:

Covid Cases: झपाट्याने वाढतोय कोव्हिडचा नवा सब व्हेरिएंट JN.1, 7 महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात रुग्णांची संख्या 800 च्या पार

Last Updated:

Covid Cases Rise 22 Percent in India: भारतात, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये 22 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 800 च्या वर गेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये भारतात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये 22 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 800 च्या पार गेली आहे. गेल्या सात महिन्यांत पहिल्यांदाच एका दिवसात रुग्णांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदवली गेली. चांगली गोष्ट म्हणजे, संपूर्ण देशात ताज्या कोरोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या अजूनही खूपच कमी आहे आणि त्यांच्या वाढीचा वेग अजूनही मंद आहे. एक्सपर्ट्स म्हणतात की, याचे कारण बहुधा कमी प्रमाणात टेस्ट आणि मोठ्या प्रमाणात संक्रमणाची तीव्रता ही सौम्य आहे. ताज्या आकडेवारीवरून दिसून आलंय की, नवीन कोविड सबवेरियंट JN.1 मुळे, देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होतोय.
कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस
advertisement

देशातील कोरोना रुग्णांची संख्या किती?

केरळमध्ये कोव्हिड संसर्ग आधीच उच्च स्थानावर पोहोचला आहे. सध्याच्या टप्प्यात राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद केली जातेय. शनिवारी (24 ते 30 डिसेंबर) संपलेल्या आठवड्यात भारतात कोविडच्या 4,652 नवीन प्रकरणांची नोंद झाली. तर गेल्या सात दिवसांत ही संख्या 3,818 होती. या आठवड्यात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यूची संख्या 17 वरून 29 वर गेली आहे. यासह, दैनंदिन संसर्गाची संख्या 841 वर आहे. जी या वर्षी 18 मे नंतरची सर्वाधिक आहे.

advertisement

Happy New Year 2024 - जगभरात असं झालं नव्या वर्षाचं स्वागत; न्यू इअर सेलिब्रेशनचे नेत्रदीपक PHOTO

महत्त्वाचं म्हणजे, केरळमध्ये या आठवड्यात कोरोनाची 2,282 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत 24 टक्के कमी आहे. तेव्हा ही संख्या 3,018 होती. यावरून दिसतं की, चार आठवडे किंवा त्याच्या आजुबाजूच्या वाढीनंतर राज्यात कोरोनाच्या प्रकरणांची संख्या पहिलेच उच्च स्थानावर पोहोचली आहे. देशामध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्व प्रकरणांमधून 50 टक्केपेक्षा कमी प्रकरणं केरळमध्ये आढळलीआहेत. तर गेल्या आठवड्यात राज्याची भागीदारी जवळपास 80 टक्के होती.

advertisement

Loksabha Elections 2024 : नितीश कुमारांचा निर्णय वाढवणार INDIA आघाडीचं टेन्शन, लालूही साथ देणार?

महाराष्ट्रात काय स्थिती?

केरळमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत असताना, इतर अनेक राज्यांमध्ये, विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रात ते वाढताय. केरळ व्यतिरिक्त, ही एकमेव राज्ये आहेत जिथे दररोज रुग्णांची संख्या 100 चा आकडा ओलांडतेय. कर्नाटकात आठवड्यात 922 नवीन संक्रमितांची नोंद झाली. ही संख्या गेल्या सात दिवसांतील 309 पेक्षा तिप्पट आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रात, नवीन प्रकरणांची संख्या गेल्या आठवड्यात 103 वरून 620 वर पोहोचली आहे. एकूणच, गेल्या आठवड्यात कोविड प्रकरणांची नोंद करणाऱ्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची संख्या 20 होती, जी 15 डिसेंबरच्या संख्येपेक्षा दुप्पट होती. जेव्हा फक्त आठ-नऊ राज्यांमध्ये नवीन संसर्गाची नोंद होत होती. यावरुन दिसून येतं की, नवीन Omicron subvariant JN.1 देशभरात पसरतोय.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Covid Cases: झपाट्याने वाढतोय कोव्हिडचा नवा सब व्हेरिएंट JN.1, 7 महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात रुग्णांची संख्या 800 च्या पार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल