TRENDING:

'Dad my strength' ज्या टॅटूचा अभिमान, त्याच टॅटूमुळे वडिलांनी मृत मुलाची पटवली ओळख, दहशतवाद्यांमुळे हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त

Last Updated:

Delhi Blast : घरात सगळे डिनरला जाण्याची तयारी करत होते आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा. सगळे डिनरला जाण्यासाठी तयार होत होते. अमरला वडिलांनी सांगितलं होतं, “तुला वाटेतून घेऊन जाऊ.” पण नियतीनं त्याला अशा प्रवासावर पाठवलं जिथून कोणीही परत येत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कधी कधी एका क्षणात संपूर्ण जग बदलून जातं आनंद, हास्य, आणि आशा एका झटक्यात अशा संपून जातात, ज्याचा आपण कधी स्वप्नात देखील विचार केला नसणार. दिल्लीत सोमवारी झालेल्या भीषण ब्लास्टने अनेक कुटुंबांची दुनिया उद्ध्वस्त केली. अशाच एका घराचं नाव आहे कटारिया कुटुंब, जिथं सध्या फक्त शांतता, शोक आणि आठवणी उरल्या आहेत. हा स्फोट केवळ एका ठिकाणाचा नव्हता, तर एका वडिलांच्या आशांचा, आईच्या मायेचा, पत्नीच्या प्रेमाचा आणि एका छोट्या मुलाच्या भविष्याचा स्फोट होता.
सोर्स : सोशल मीडिया, दिल्ली स्फोट
सोर्स : सोशल मीडिया, दिल्ली स्फोट
advertisement

अमर कटारियाचं वय फक्त 34 वर्षं. बाइकिंग आणि प्रवासाचा शौकीन, हसरा, नेहमी आनंदात राहणारा, मित्रांच्या मते “महफिलीची जान”. दिल्लीच्या चांदणी चौकातील भागीरथ पॅलेसमध्ये त्याचा औषध व्यवसाय होता. सोमवार संध्याकाळी झालेल्या स्फोटात तो दुर्दैवाने सापडला. घरात सगळे डिनरला जाण्याची तयारी करत होते आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा. सगळे डिनरला जाण्यासाठी तयार होत होते. अमरला वडिलांनी सांगितलं होतं, “तुला वाटेतून घेऊन जाऊ.” पण नियतीनं त्याला अशा प्रवासावर पाठवलं जिथून कोणीही परत येत नाही.

advertisement

रात्री उशिरा वडील जगदीश कटारियांना हॉस्पिटलमधून फोन आला. त्यांना सांगितलं गेलं की एक अज्ञात व्यक्ती सापडली आहे, ज्याचा मृत्यू झाला आहे आण त्याच्या हातावर टॅटू आहे. Mom My First Love, Dad My Strength आणि Kriti लिहिलंय. हे ऐकून वडिलांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडले नाहीत, फक्त थरथरत्या आवाजात ते म्हणाले “हो, तो माझा अमरच आहे…”

advertisement

त्या क्षणी संपूर्ण घरात शांतता पसली. मुलाची बातमी ऐकताच आई कोसळली, बहिण बेशुद्ध पडली, आणि पत्नीने मुलाला छातीशी घट्ट धरून घेतलं.

संपूर्ण रात्र कुटुंबीय अमरचा शोध घेत फिरत होते. पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी होते, पण आतपर्यंत कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. पहाटे चारच्या सुमारास अखेर अमरचा मृतदेह दिसला शरीरावर कोणतेही मोठे जखम नव्हते, फक्त मानेच्या मागच्या बाजूला एक खोल जखम होत. जणू कोणीतरी त्याच्या जीवनाची दोरी तिथेच कापून टाकली होती. म्हणजे मानेला लागलेल्या त्या जखमेमुळेच त्याचा जीव गेला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

आज त्या घरात फक्त शांतता आहे. आई, वडील, बहिण आणि चार वर्षांपूर्वी नववधू बनून आलेली पत्नी. आणि एक तीन वर्षांचा मुलगा, ज्याला अजून कळलेलं नाही की त्याच्या छोट्याशा विश्वात एक असा स्फोट झाला आहे, ज्याने सगळं काही अंधारात ढकलून दिलं आहे.

मराठी बातम्या/देश/
'Dad my strength' ज्या टॅटूचा अभिमान, त्याच टॅटूमुळे वडिलांनी मृत मुलाची पटवली ओळख, दहशतवाद्यांमुळे हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल