TRENDING:

Delhi News : स्फोटाच्या आवाजाने दिल्लीत पुन्हा खळबळ, रॅडिसन हॉटेलजवळ काय झालं? पोलिसांनी महत्त्वाची अपडेट

Last Updated:

Delhi Mahipalpur Blast : दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकल्याचे वृत्त समोल आले आहे. रेडिसन हॉटेलजवळ स्फोटाचे आवाज ऐकू आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली: दिल्लीतील महिपालपूरमध्ये रेडिसन हॉटेलजवळ स्फोटाचे आवाज ऐकू आले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आज सकाळच्या सुमारास आवाज ऐकल्याने एकच खळबळ उडाली. स्फोटाचे आवाज ऐकल्यानंतर काहींनी पोलिसांना फोन करून आवाज ऐकल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने यंत्रणांची चक्रे फिरली.
File Photo
File Photo
advertisement

गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी ९:१८ वाजता अग्निशमन विभागाला फोन करण्यात आला. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे म्हटले आहे. सध्या, तीन अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित आहेत. सध्या, दिल्ली पोलिसांनी परिसराची पडताळणी केली आहे आणि काहीही संशयास्पद आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

advertisement

सोमवारी, सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये ब्लास्ट झाला. या स्फोटात १२ जण ठार झाले. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. ही घटना दहशतवादी हल्लाच असल्याचे सरकारकडून बुधवारी सांगण्यात आले. दिल्लीतील कार स्फोटानंतर तणावाचे वातावरण आहे. अशातच आज, रेडिसन हॉटेलजवळ स्फोटाचे आवाज ऐकू आल्याने मोठी खळबळ उडाली.

स्फोटाचा आवाज कसला?

advertisement

दिल्लीतील महिपालपूर येथील रेडिसन हॉटेलजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला. गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी ९:१८ वाजता अग्निशमन विभागाला फोन करण्यात आला. स्फोटाचे कारण तपासात उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की डीटीसी बसमध्ये टायर फुटल्याने हा आवाज आला. घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नाही. सध्या तीन अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित आहेत.

गुरुग्रामला जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावरची दहशत कमी होणार, पुण्यात भटक्या कुत्र्यांसाठी प्लॅन ठरला...
सर्व पहा

डीसीपी साउथ वेस्ट यांनी सांगितले की महिपालपूरमधील रेडिसनजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. कॉल करणाऱ्याशी संपर्क साधण्यात आला. त्याने सांगितले की,  गुरुग्रामला जात असताना मोठा आवाज ऐकू आला. घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नाही. स्थानिक चौकशीदरम्यान, एका गार्डने सांगितले की धौला कुआनला जाणाऱ्या डीटीसी बसमध्ये मागील टायर फुटल्यामुळे हा आवाज आला. परिस्थिती सामान्य आहे आणि काळजी करण्याचे कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Delhi News : स्फोटाच्या आवाजाने दिल्लीत पुन्हा खळबळ, रॅडिसन हॉटेलजवळ काय झालं? पोलिसांनी महत्त्वाची अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल