भिंडमध्ये केलं कोर्ट मॅरेज
सलोनी आणि आशिषचं लग्न मध्य प्रदेशमधल्या भिंड इथल्या एडीएम कोर्टात झालं होतं. या साध्या लग्नात फक्त दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांचा लग्नाचा खर्च फक्त कोर्ट फी एवढाच होता. ही फी फक्त 500 रुपये होती. आशिष वशिष्ठ राजस्थानमधल्या अलवरचे आहेत, तर सलोनी सिदाना पंजाबच्या जलालाबादच्या आहेत. खास म्हणजे दोघेही आपापल्या कुटुंबातले पहिले आयएएस अधिकारी आहेत.
advertisement
सोर्स : सोशल मीडिया
सोशल मीडियाच्या झगमगाटापासून दूर
लग्नानंतर या जोडप्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोघंही सोशल मीडियाच्या झगमगाटापासून खूप दूर आहेत. आशिष वशिष्ठ आयआयटी रुरुकीमधून ग्रॅज्युएट झाले असून, सध्या ते भोपाळचे एडीएम म्हणून काम करत आहेत. सलोनी सिदाना यांचं एमबीबीएस पूर्ण झालं असून, त्या डॉक्टर आहेत. त्या सध्या जबलपूरमध्ये पोस्टेड आहेत. लग्नानंतर सलोनी यांनी पतीसोबत राहण्यासाठी केडर बदलून घेतलं.
LBSNAA मध्ये सुरू झाली प्रेमकहाणी
सलोनी सिदाना आणि आशिष वशिष्ठ हे दोघंही 2014च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची प्रेमकहाणी मसुरीतल्या लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) या संस्थेत सुरू झाली. ते त्यांच्या आयएएस ट्रेनिंगसाठी पहिल्यांदा तिथे भेटले होते. काही काळाने त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी खूपच साधेपणाने लग्न केलं. लग्नासाठी फक्त 500 रुपये खर्च करण्याचा या जोडप्याने निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांना आश्चर्य वाटलं. कारण आपल्या देशात लग्नाचा खर्च लाख किंवा कोटींमध्ये असतो. तिथे या दोघांनी 500 रुपयांत लग्न केलं होतं.