चक्रीवादळाबाबत बोलताना हवामान विभागाच्या उमाशंकर दास यांनी म्हटलं की, संभाव्य चक्रीवादळाचा मार्ग आणि इतर बाबींबद्दल लगेच सांगता येणार नाही. ओडिशा किंवा इतर किनारपट्टीला या वादळामुळे धोका आहे की नाही याबाबत काही सांगितलेलं नाही. येत्या चार दिवसात ओडिशा किनारपट्टीला काही इशारा नाही. ओडिशा किनारपट्टीवर असलेल्या मच्छिमारांनाही कोणताच इशारा दिलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडुत पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. तामिळनाडुसुद्धा चक्रीवादळासाठी तयार होत आहे. ४ डिसेंबरला तामिळनाडु आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळ माइचोंग धडकण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडुची उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी, कराइकलच्या नागरिकांना ३ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा तर ४ डिसेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
चक्रीवादळ माइचोंग हिंदी महासागरातलं यंदाच्या वर्षातलं सहावं तर बंगालच्या खाडीतलं चौथं वादळ आहे. या चक्रीवादळाला म्यानमारने नावं दिलं होतं. हवामान विभागाने अंदमान, निकोबार बेटासह ओडिशात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.