TRENDING:

जरा याद उन्हे भी कर लो, जो लौट के घर न आये... 'ऑपरेशन सिंदूर' राबवताना भारतमातेचे ८ जवान शहीद

Last Updated:

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्तव्यावर असलेल्या सैनिकांना प्राण गमवावे लागले अशा शूरवीर सैनिकांना सीआयएसएफकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत भारताच्या तिन्ही सैन्यदलातील सैनिकांनी भाग घेतला.या कारवाईदरम्यान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात ८ भारतीय लष्कराचे जवानही शहीद झाले. लष्कराने या शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूर
advertisement

सीआयएसएफने समाज माध्यमावर शहीद सैनिकांचे फोटो शेअर करीत, ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्तव्यावर असलेल्या सैनिकांना प्राण गमवावे लागले अशा शूरवीर सैनिकांना सीआयएसएफकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे. भारत देश जवानांच्या धैर्याचे, शौर्याचे आणि सर्वोच्च बलिदानाचे नेहमीच ऋणी राहील. शोकाकुल कुटुंबांसोबत आमच्या मनापासून संवेदना असतील, असे सीएसआयअफने म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूर कारवाईत ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि शस्त्रांच्या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचे ३५ ते ४० जवान मृत्युमुखी पडले आहेत. आमची लढाई फक्त आणि फक्त दहशतवाद्यांशी आहे हे लष्कराने आधीच स्पष्ट केले होते. आम्ही फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केले, पाकिस्तानी लष्कराच्या तळांना टार्गेट केले नाही, असेही भारतीय लष्कराने सांगितले.

advertisement

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने ६ मे च्या रात्री आणि ७ मे च्या सकाळी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले. यासोबतच या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या कारवाईनंतर झालेल्या गोळीबार आणि हल्ल्यांमध्ये ८ भारतीय लष्कराचे जवान सहभागी होते. यामध्ये मुरली नायक, मोहम्मद यांचा समावेश आहे. इम्तियाज शहीद, दिनेश शर्मा, सचिन यादव, कमल कंबोज, अमित चौधरी, सुरेंद्र मोगरा आणि सूरज यादव यांना देशाची सेवा करताना वीरमरण आले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
जरा याद उन्हे भी कर लो, जो लौट के घर न आये... 'ऑपरेशन सिंदूर' राबवताना भारतमातेचे ८ जवान शहीद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल