TRENDING:

India Pakistan : शस्त्रसंधीनंतर भारत-पाकमध्ये चर्चा, DGMO बैठकीत मोठी घडामोड, समोर आली अपडेट

Last Updated:

India Pakistan Talk : पाकिस्तान आणि भारताच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात सोमवारी, 12 मे रोजी चर्चेची पहिली फेरी पार पडली. पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला आणि भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी हॉटलाइनवर एकमेकांशी चर्चा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India Pakista Ceasefire :  ऑपरेशन सिंदूरनंतर, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी शनिवारी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. पाकिस्तान आणि भारताच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात सोमवारी, 12 मे रोजी चर्चेची पहिली फेरी पार पडली. पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला आणि भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी हॉटलाइनवर एकमेकांशी चर्चा केली. पाकिस्ताननेदेखील या चर्चेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
advertisement

डीजीएमओमध्ये काय चर्चा झाली?

डीजीएमओंमधील चर्चेत दोन्ही बाजूंनी एकही गोळी झाडणार नाही ही वचनबद्धता कायम ठेवण्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. एकमेकांविरुद्ध कोणतीही आक्रमक आणि शत्रुत्वाची कारवाई करणार नाही. सीमा आणि पुढच्या भागातून सैन्याची संख्या कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचा विचार दोन्ही बाजूंनी करावा यावरही सहमती झाली. शनिवारी जमीन, हवा आणि समुद्रात सर्व प्रकारच्या गोळीबार आणि लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्याच्या कराराची घोषणा झाल्यानंतर, दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी आज सोमवारी पहिल्यांदाच चर्चा केली.

advertisement

'पाकिस्तान यापुढे हा संघर्ष करणार नाही'

लष्कराच्या म्हणण्यानुसार, भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी सीमा आणि पुढच्या भागातून सैन्याची संख्या कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजनांचा विचार करावा यावर सहमती झाली. यामध्ये नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत पाकिस्तानने म्हटले आहे की आता ते हा संघर्ष पुढे नेणार नाही. पाकिस्तानने असेही म्हटले आहे की ते युद्धबंदीचे उल्लंघन करणार नाहीत. नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी 2021 मध्ये भारत-पाकिस्तान डीजीएमओंनी नवीन युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केली.

advertisement

पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांच्या बाजूने लढले

सोमवारी लष्कराने ऑपरेशन सिंदूरबाबत पत्रकार परिषद घेतली. लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, पहलगामने दहशतवाद्यांच्या पापांचा घडाचा भरला आहे. आमचे दहशतवाद्यांवर अचूक हल्ले नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून करण्यात आले. आम्हाला पूर्ण कल्पना होती की पाकिस्तानचा हल्ला सीमेपलीकडूनही होईल, म्हणून आम्ही हवाई संरक्षणाची तयारी केली होती. 9-10 मे रोजी जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने आमच्या हवाई तळांवर हल्ला केला तेव्हा ते या मजबूत हवाई संरक्षणासमोर अपयशी ठरले. एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आम्हाला वाटत होते की आम्ही दहशतवाद्यांशी लढत आहोत, पण पाकिस्तानी सैन्याने त्यात उडी घेतली. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली असल्याचे त्यांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
India Pakistan : शस्त्रसंधीनंतर भारत-पाकमध्ये चर्चा, DGMO बैठकीत मोठी घडामोड, समोर आली अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल