या कारमध्ये पोलिसांना तपासादरम्यान एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीतून जे समोर आलं त्यानंतर पायाखालची जमीन सरकरली. एकाच कुटुंबातील सात व्यक्तींचे मृतदेह कारमध्ये होते. या कुटुंबाने विष घेऊन आयुष्य संपवल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. या कारवर डेहदादूनचा नंबर होता. रात्री 11 च्या सुमारास पंचकुला इथे सेक्टर 27 मध्ये ही कार उभी असलेली दिसली. त्यामध्ये सात जणांचे मृतदेह होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांची तीन मुले आणि कुटुंबातील दोन वृद्ध सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून सर्वांना रुग्णालयात नेले, जिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आले. एका व्यक्तीची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पण नंतर त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी दोघांची ओळख प्रवीण मित्तल आणि त्यांचे वडील देशराज मित्तल अशी झाली आहे.
सुरुवातीच्या तपासात आयुष्य संपवण्याचं कारण कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच डीसीपी हिमाद्री कौशिक घटनास्थळी पोहोचले. याशिवाय डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था अमित दहिया यांनीही घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही धक्कादायक घटना हरियाणातील पंचकुला येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. बागेश्वर धाममधून एका कार्यक्रम आटपून हे आपल्या घरी जात असताना त्यांनी वाटेत जात असताना गाडी थांबवून हा टोकाचा निर्णय घेतला. प्रवीण मित्तल नावाचा एक व्यक्ती डेहराडूनमध्ये टूर आणि ट्रॅव्हलचा व्यवसाय करत होता. परंतु त्यात मोठे नुकसान झाल्यामुळे त्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे कुटुंब पंचकुला येथे का आले होते आणि त्यांनी येथे आत्महत्या का केली. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या घराजवळ गाडी पार्क केली होती त्या घराजवळ हे लोक काय करत होते?