उड्डाण करताना रनवे सोडून बाहेर गेलं
मिळालेल्या माहितीनुसार, हा खासगी जेट विमान धावपट्टीवरून उड्डाण भरत असताना अचानक अनियंत्रित झाले आणि त्याचा अपघात झाला. विमान धावपट्टीवर कोसळल्यामुळे या घटनेने परिसरात मोठा थरार निर्माण झाला होता. अपघात नेमका कशामुळे झाला, विमानाचा ताबा नेमका कोणत्या कारणामुळे सुटला, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
advertisement
विमान अपघातानंतरचा व्हिडीओ
कारण अस्पष्ट चौकशी सुरू
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, विमानातील सर्व लोक सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून, विमान कंपन्या आणि नागरी उड्डाण प्राधिकरणाचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.
advertisement
Location :
Uttar Pradesh
First Published :
October 09, 2025 2:11 PM IST