TRENDING:

I Love Muhammad : कोण आहे लेडी IPS अंशिका? जिने धगधगत्या बरेलीला केलंय कंट्रोल, धाकाची देशात चर्चा

Last Updated:

अंशिका वर्मा नक्की आहे तरी कोण? कुठल्या? ज्यांनी अख्खी बरेली संभाळली आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला. चला जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियावर सध्या “आय लव मोहम्मद” अशा घोषणा, पोस्ट्स आणि व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घोषणांमुळे काही ठिकाणी तणाव आणि उपद्रवाची परिस्थितीही निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील बरेली येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महिला कमांडो SOG युनिटची तैनाती करण्यात आली. यामुळे स्थानिकांमध्ये सुरक्षिततेचा भाव निर्माण झाला आहे. सर्वत्र या पथकाचं आणि त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक होत आहे. (i love mohammad bareli) त्या महिला SOG युनिटचं नेतृत्व करत आहेत ASP अंशिका वर्मा.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण अंशिका वर्मा नक्की आहे तरी कोण? कुठल्या? ज्यांनी अख्खी बरेली संभाळली आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला. चला जाणून घेऊ.

कोण आहे IPS अंशिका वर्मा? (who is anshika verma)

अंशिका वर्मा 2021 बॅचच्या तेजतर्रार IPS अधिकारी आहेत आणि त्या मूळच्या प्रयागराजच्या रहिवासी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक. पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. पहिली पोस्टिंग त्यांची फतेहपूर सीकरी (आग्रा) येथे SHO म्हणून झाली. नंतर 18 डिसेंबर 2023 रोजी त्यांची गोरखपूरमध्ये ASP म्हणून नियुक्ती झाली आणि सध्या त्या बरेलीत कार्यरत आहेत.

advertisement

अंशिका वर्मा या फक्त 29 वर्षांच्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म 3 जानेवारी 1996 ला झाला.

बरेलीच्या रस्त्यावर महिला SOG

अलीकडच्या बरेली बवालात महिला SOG युनिटने थेट रस्त्यावर उतरून पेट्रोलिंग केलं. अत्याधुनिक शस्त्रसज्ज असलेल्या या कमांडोंनी उपद्रव आटोक्यात ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मोलाचं काम केलं. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं हा या युनिटचा मुख्य उद्देश आहेत.

advertisement

या पथकातील महिला कमांडोंना मार्शल आर्ट, अत्याधुनिक शस्त्रांचा वापर, गर्दी नियंत्रण, शांतता प्रस्थापित करणे अशा सर्व बाबींचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे हे युनिट कोणत्याही परिस्थितीत उपद्रवाशी दोन हात करण्यास सक्षम आहेत.

महिला सुरक्षेबाबत स्पष्ट भूमिका

अंशिका वर्मा म्हणतात, “महिला SOG फक्त महिलांच्या सुरक्षिततेसाठीच नाही तर उपद्रव किंवा बवालाच्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशिक्षित आहे.” त्यांच्या नेतृत्वाखालील महिला कमांडोंनी बरेलीच्या रस्त्यांवर दाखवलेली धाडसी उपस्थिती नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

advertisement

उत्तर प्रदेशची पहिली महिला SOG

बरेलीत तैनात करण्यात आलेली ही युनिट ही उत्तर प्रदेशातील पहिली महिला SOG युनिट आहे. तिची उपस्थिती गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करते आणि त्याचबरोबर महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं कामही करते.

मराठी बातम्या/देश/
I Love Muhammad : कोण आहे लेडी IPS अंशिका? जिने धगधगत्या बरेलीला केलंय कंट्रोल, धाकाची देशात चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल