सणासुदीच्या काळात रेल्वेच्या वाढलेल्या फेऱ्यांमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना विशेष फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध स्टेशन्सवरून या विशेष गाड्या धावणार आहेत. काही प्रमुख गाड्यांबाबत याठिकाणी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय इतर विशेष गाड्यांची माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्या? पाहा श्राद्ध तिथी आणि विधी
advertisement
कोल्हापूर-सीएसएमटी-कोल्हापूर साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 01418 कोल्हापूर ते सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाडी 24 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी प्रत्येक बुधवारी कोल्हापूर येथून रात्री 10 वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.
गाडी क्रमांक 01417 सीएसएमटी-कोल्हापूर साप्ताहिक विशेष गाडी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी प्रत्येक गुरुवारी सीएसएमटी येथून दुपारी 2.30 मिनिटांनी सुटेल आणि कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 4.20 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी मिरज, सांगली, किर्लोस्कर वाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण या स्टेशनवर थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नॉर्थ-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 01463 एलटीटी-तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक विशेष गाडी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 4 वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम नॉर्थ येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी पोहचेल.
गाडी क्रमांक 01464 तिरुवनंतपुरम नॉर्थ-एलटीटी विशेष गाडी 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शनिवारी तिरुवनंतपुरम नॉर्थ येथून 4 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सवंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुर, उडीपी, मंगलोर, कासरगोड, कान्नूर, कालिकट, तिरूर, शोरानूर, त्रिचूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कयंकुलम जंक्शन आणि कोल्लम या स्टेशन्सवर थांबेल.
पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष
गाडी क्रमांक 01491 पुणे-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी पुणे येथून संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01492 हजरत निजामुद्दीन-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन 27 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री 9 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, उधना, सूरत, वडोदरा जं., गोधरा, रतलाम, शामगढ़, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, भरतपूर जं., मथुरा या स्टेशन्सवर थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 01179 लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष ट्रेन 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी एलटीटी येथून सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री 9 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01180 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेन 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी सावंतवाडी रोड येथून रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. हा गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्टेशन्सवर थांबेल.
सीएसएमटी-गोरखपूर-सीएसएमटी विशेष ट्रेन
गाडी क्रमांक 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरखपूर विशेष ट्रेन 26 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सीएसएमटी येथून रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01080 गोरखपूर-सीएसएमटी विशेष ट्रेन 28 सप्टेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत गोरखपूर येथून दररोज दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद या स्टेशन्सवर थांबेल.