TRENDING:

India Pakistan Tension : भारताच्या हल्ल्याची भीती, पाकिस्तानमध्ये ISI ने केली बंडखोरी? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

India Pakistan Tension : भारत-पाकिस्तान सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर, दुसरीकडे भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकावल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी आता दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांचे स्लीपर सेल आता एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. भारत-पाकिस्तान सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर, दुसरीकडे भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकावल्याची माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही घटना केवळ उच्चपदस्थ नियुक्ती नसून, पाकिस्तानातील सत्तासंरचनेत मोठे आणि चिंताजनक बदल सूचित करत असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानमध्ये सत्तांतर होणार?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य आणि तीव्र प्रतिसादाची भीती पाकिस्तानमधील लष्करी नेतृत्वामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळेच देशातील निर्णयप्रक्रियेवर लष्कराचा प्रभाव वाढवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असल्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तुळांमध्ये वर्तवला जात आहे. या NSA वरील नेमणुकीमुळे पाकिस्तानमध्ये एक प्रकारचा ‘शांत, अनौपचारिक लष्करी सत्ता हस्तांतरण’ घडल्याची चर्चा आहे. लोकांमध्ये अल्पसंख्य पाठिंबा असलेले लष्करी नेतृत्व आता भारतीय प्रतिउत्तराच्या धास्तीचा वापर करत कार्यकारी अधिकार आणि धोरणात्मक निर्णयांवर वर्चस्व मिळवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

advertisement

पाकिस्तान सरकार उलथणार?

राजकीय स्थैर्य अभावी आणि लोकशाही संस्थांच्या कमकुवततेमुळे अशा लष्करी हस्तक्षेपांना पाकिस्तानमध्ये नेहमीच वाव मिळत आला आहे. मात्र, NSA सारख्या संवेदनशील आणि धोरणात्मक पदावर थेट ISI प्रमुखाची नियुक्ती हा एक गंभीर टप्पा मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवणार की मागील दाराने नियंत्रण ठेवणार, याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना सत्तासूत्रे आपल्या हाती घ्यायची आहेत, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळेच पाक लष्करप्रमुखांच्या आदेशानंतर पहलगामधील दहशतवादी घटना झाली असल्याचे समोर आले.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
India Pakistan Tension : भारताच्या हल्ल्याची भीती, पाकिस्तानमध्ये ISI ने केली बंडखोरी? समोर आली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल