Marathi Actor : मराठी मालिकाविश्वात काम करणाऱ्यांना वेळेवर मानधन न मिळणं किंवा थकवणं , सेटवर काळजी न घेणं, फसवणूक अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. 'पारू' या मालिकेतील अभिनेता शंतनू गंगणेनं नुकताच याबद्दल आवाज उठवला होता. अशातच स्टार प्रवाह या आघाडीच्या वाहिनीवरील 'आई बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेतील अभिनेता आदिश वैद्यने मालिका अचानक सोडली आहे. आदिश मालिकेत दिसत नसल्याने त्याचे चाहते हैराण झाले होते. अखेर अभिनेत्याने यावर भाष्य केलं आहे. आदिश वैद्यच्या वडीलांचा एका गंभीर आजारासोबत लढा सुरू आहे. सध्या उपचार सुरू आहेत. अशातच वडील अॅडमिट असताना अभिनेत्याला सेट सोडलास तर बघ अशा धमक्या, शिवीगाळ ते अंगावर धावून आल्याने त्याने मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत मालिकेतून काढता पाय काढल्याबद्दल आदिश वैद्य म्हणाला,"एका अभिनेत्याचं आयुष्यात अजिबात सोपं नाही. फक्त अभिनय नव्हे तर अनेक गोष्टी एक नट म्हणून हँडल कराव्या लागतात. अभिनेत्यांना सहज टार्गेट केलं जातं. एखाद्या मालिकेतून माघार हे एका अभिनेत्यासाठी किंवा माझ्यासाठी सोपं अजिबात नाही. पण मला काही कॉल्स घ्यावे लागले. कारण ते गरजेचे होते. कारण माझ्या आयुष्यात आता 10 वर्षांच्या करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात एक अशी घटना घडली होती जी कधीच कोणासोबत घडू नये. माझे एक हिंदी आणि एक मराठी असे दोन शो सुरू होते. माझं माझ्या कामावर प्रचंड प्रेम आहे. 10 वर्षात मी कष्टाने कमावलं आहे".
Smita Patil : बर्फात सुजलेलं शरीर अन् स्मिताचा शेवटचा मेकअप, आर्टिस्टने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग
आदिश पुढे म्हणाला,"जेव्हा तुम्हाला ऑन सेट आरडाओरडा, शिव्यागाळ किंवा वर्बली फिजीकली जर कोणी अटॅक करत असेल तर ते तुमच्या सेल्फ रिस्पेक्टवर येतं. कारण ही गोष्ट मी एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून कधीच फेस केली नाही. माझ्या करिअरमध्ये मला खूप चांगले लोक भेटले आहेत. प्रेमाने काम करणारे लोक मला भेटले. मी दुसऱ्यांच्या स्वभावाची काळजी घेतो आणि स्वत:च्याही घेतो. दोन मालिका करत असल्याने कधी या सेटवर कधी त्या सेटवर जावं लागत होतं. सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत मी दोन्ही मालिकांसाठी शूट करत होतो. पण प्रोडक्शनमधल्या एका वैयक्तिने या गोष्टीचं प्रेशर घेतल्यामुळे त्याचे इगो क्लॅश माझ्यासोबत झाले. दोन्ही मालिका एकत्र करणार याच टर्मवर त्यांनी मला घेतलं होतं. दोन्ही सेटवर वेळेत पोहोचायला मी काहीही कष्ट केले आहेत".
एखाद्याचं प्रेशर त्याला हँडल होत नाही आहे. म्हणून जर तो एखाद्या अॅक्टरला किंवा मला सांगणार असेल की मी सांगेल तोवर सेट सोडून जायचं नाही आणि गेलास तर मी बघेन काय करायचं वगैरे. तिथे मी हेच उत्तर दिलं होतं की माझे वडील लिलावतीमध्ये अॅडमिट होते. अजूनही त्यांचे उपचार सुरू आहेत. एका दिवशी तीन तासांसाठी मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं. त्यामुळे एक दिवस आधी मी त्या माणसाला सांगितलं होतं की मला उद्या तीन तासांसाठी जावं लागेल. नंतर शिफ्ट एक्सटेंड करायलाही मी तयार होतो. पण आता मी बघतोच तू कसा जातो? असं त्या संबंधित वैयक्तिचं वागणं होतं. आपल्या इंडस्ट्रीत अंगावर धावून येणं हे कुठे घडतं? याप्रकरणी चॅनलसोबत सध्या माझं बोलणं असल्याचं, आदिश वैद्य म्हणाला.
आदिश वैद्यने 'झिंगदी नॉट आईट', 'कुंकू टिकली आणि टॅटू', 'रात्रीस खेळ चाले', 'सवी की सवारी', 'पुष्पा इम्पॉसिबल', 'गणपती बाप्पा मोरया', 'बॅरिस्टर बहू' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.